CCTV sakla
सोलापूर

CCTV : गुन्हेगारांवर आता ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर

नगरसेवकांच्या वॉर्डवाईज निधीतून ६७ चौकांत सीसीटीव्ही

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दयानंद कॉलेजजवळील अपघातात तरुणाचा मृत्यू, छत्रपती शिवाजी चौकात वृद्धाची लूट, बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या बहुतेक दुचाकी चोरींचा आणि काही घरफोडींचा तपास अजूनही सुरूच आहे. सीसीटीव्ही ज्या ठिकाणी होते, तेथील गुन्ह्यांचा तपास काही दिवसांत मार्गी लागला. शहराची सुरक्षितता व सुव्यवस्थेसाठी आता नगरसेवकांच्या वॉर्डवाईज निधीतून महापालिका व स्मार्ट सिटीतून ४०७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत.

शहरात प्रवेश केलेली वाहने किंवा व्यक्ती शहरातून बाहेर पडतात. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने त्या प्रत्येक वाहनावर, व्यक्तीवर सीसीटीव्हीचा वॉच काळाची गरज आहे. पण, सोलापूर शहरात बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत तथा अत्यल्प आहेत. महापालिकेने संभाजीराजे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा ठिकाणी कॅमेरे बसविले. पण, त्यातील बहुतेक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्हींची संख्या खूपच कमी आहे.

शहरात घरफोडी, दुचाकी चोरी अशा घटना वाढत आहेत. नागरिकांना अनेकदा आवाहन करूनही हाउसिंग सोसायट्या, मोठमोठ्या अपार्टमेंट्‌समध्ये अद्याप सीसीटीव्ही नाहीत. शहराचा विस्तार वाढला, लोकसंख्या वाढली, पण पोलिस ठाणे व मनुष्यबळ तेवढेच आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, सर्वांनी ते बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बाजार समिती, खासगी बॅंका, मोठे व्यापारी, दुकानदारांनी सीसीटीव्ही लावले. पण, हे कॅमेरे बाहेरील बाजूला शटरवर लावले आहेत. रस्त्याच्या बाजूला त्याची दिशा असायला हवी. हाउसिंग सोसायट्या, मोठ्या अपार्टमेंट्‌समध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीची मोठी गरज आहे. चोरीचे प्रकार व गुन्हेगारांची शैली बदलल्याने सीसीटीव्हीचा मोठा फायदा पोलिसांना होतो. त्यामुळे सर्वांनी सीसीटीव्ही लावावेत.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT