Bhagvan Mahavir 
सोलापूर

कोरोना : घरातच साजरी करा भगवान महावीर जयंती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : यावर्षी कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गामुळे जैन समाजातर्फे सोमवारी (ता. 6) साध्या पद्धतीने भगवान महावीर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. जैन समाजबांधवांनी घरीच महावीरांची जयंती साजरी करावी. सकाळी 10.20 वाजता 20 माळांचा "ओम श्री श्री महावीर स्वामी अर्हते नमः' मंत्राचा जप करावा, असे आवाहन जैन श्‍वेतांबर मूर्तिपूजक संघाचे सचिव कल्पेश मालू यांनी केले आहे.

कोरोना विषाणू जगापासून दूर जाऊ दे...
सोमवारी सायंकाळी सात वाजता पाच दीप प्रज्वलित करावेत आणि "हे देवाधिदेव, सर्वोच्च महावीर स्वामी, आपण जन्मला तेव्हा जगातील सर्व प्राण्यांना शांतता होती. नरकीच्या प्राण्यांनीसुद्धा एक क्षण शांततेचा अनुभव घेतला. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे दु:खी झाले आहे, काळजीत आहे. प्रभू, हा कोरोना विषाणू जगापासून दूर जाऊ दे आणि शांती जगावर असू दे. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या आत्म्यांचे दु:ख दूर व्हावे,' अशी प्रार्थना देवाला करावी, असे आवाहनही श्री. मालू यांनी केले आहे.

महावीरांनी दाखवला जगाला प्रेम व शांतीचा मार्ग
शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. 599 अथवा इ.स.पू. 615 मध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. भगवान महावीर यांनी तप व ज्ञानाच्या आधारे सर्व इच्छा व विकार यांच्यावर नियंत्रण मिळवले, त्यामुळे त्यांना "महावीर' म्हणून ओळखले जाते. त्यांनी जगाला प्रेम व अहिंसेचा मार्ग दाखवला.

दरवर्षी होत असते सामूहिक जयंती उत्सव साजरा
सोमवारी भगवान महावीर यांची जयंती आहे. जैन धर्मात महावीर जयंतीचे पर्व महापर्व म्हणून मानले जाते. सोलापुरात महावीर जयंती 1960 पासून साजरी केली जात आहे. दरवर्षी जैन श्‍वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे जोडभावी पेठ येथून रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेत जोडभावी पेठ येथील आदिनाथ मंदिराची रथयात्रा सामील होते. ही रथयात्रा बाळीवेस, टिळक चौक मार्गे निघून माणिक चौक येथील आदिनाथ मंदिर येथे रथयात्रेचा समारोप होतो. जैन श्‍वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या मिरवणुकीची सांगता जोडभावी पेठ येथील मंदिरात येते. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम, प्रसाद वाटप, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम पार पडतात. सायंकाळी पाळणा कार्यक्रम होतो. मात्र या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Scheme : लाडक्या बहिणींनो सावधान! योजनेच्या फॉर्मसाठी जास्तीचे पैसे देताय? सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल, सेवा केंद्रचालकांचे धाबे दणाणले

Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Destination Wedding India: डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय? उदयपूरशिवाय निवडा हे 4 शानदार ठिकाण, होईल शाही लग्नाचे स्वप्न पूर्ण

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT