Mohol Fiood 
सोलापूर

महावितरणसमोर असणार विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील अनेक गावांत व गावातील घरांत पावसाचे व नदीचे पाणी शिरल्याने त्या ठिकाणचे विद्युत ट्रान्स्फॉर्मर व 33 केव्ही लाइन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पाणी ओसरल्यावरच महावितरणचे किती नुकसान झाले आहे हे समजणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून चार विद्युत उपकेंद्रे बंद असल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता हेमंत ताकपेरे यांनी दिली. 

मंगळवारी रात्रीपासून व बुधवारी दिवसभर पावसाने सर्वत्र हाहा:कार माजविला आहे. मोहोळ तालुक्‍यातील सुमारे 14 ते 15 गावांना व या गावातील घरांना पुराच्या व पावसाच्या पाण्याने वेढा टाकला आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या मुख्य विद्युत वाहिन्या व ट्रान्स्फॉर्मर पाण्याखाली गेले आहेत तर विद्युत खांबही पडले आहेत. ट्रान्स्फॉर्मरमध्ये घाणही गेली आहे. 

तालुक्‍यातील कामती, जामगाव ,भांबेवाडी, नरखेड ही चार विद्युत उपकेंद्रे बंद आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. विद्युत पुरवठ्याअभावी मोबाईल चार्जिंगची अडचण झाल्याने एकमेकांशी परिणामी प्रशासनाशी संपर्क करण्यासाठी नागरिकांना अडचणी येत आहेत. 

याबाबत अभियंता ताकपेरे म्हणाले, पाणी उतरल्यावरच ट्रान्स्फॉर्मर स्वच्छ करून पडलेले विद्युत खांब उभे करून नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत करणे हे महावितरण समोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी साहित्य व मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. दरम्यान, पाणी ओसरल्यानंतर आम्ही तातडीने उपाययोजना करून लवकरात लवकर नागरिकांचा विद्युत पुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहोत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

Maharashtra School Inspection : राज्यातील साडेपाच हजार शाळांची होणार तपासणी; १५ दिवस फिरणार पथकं; कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश

Inscription in Junnar : जुन्नरमध्ये यादवकालीन शिलालेख उजेडात; राजा सिंघणदेव द्वितीय याने कसण्यासाठी जमीन दान केल्याचा उल्लेख

Video: अभिनेत्रीने मारली चक्क 40 फूट खोल विहिरीत उडी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'त्ये कसाय माहित्ये का..?'

SCROLL FOR NEXT