inspires.jpg 
सोलापूर

कोरोना संकटात इन्स्पायर्ड अवार्ड योजनेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे आव्हान 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः मुलांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या सृजनशील विचारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग , भारत सरकार व राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान, भारत सरकार यांच्यामार्फत दरवर्षी इयत्ता सहावी वी ते इयत्ता दहावीवी तील ( वय 10 ते15 वर्षे ) इन्स्पायर अवार्ड मानक यासाठी प्रत्येक राज्यातील सर्व शासनमान्य , सर्व माध्यमांच्या शाळेकडून नामांकने मागविली जातात . यामध्ये प्रत्येक शाळेतील 2 ते 3 व जास्तीत जास्त 5 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येते . विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पनांची माहिती नामांकनात भरावी लागते. 

हेही वाचाः शहरातील दुकाने आता नऊ पर्यंत सुरू राहणार, सिनेमागृहांना मात्र टाळेच 

सर्वोत्तम एक लाख नवविचारांना प्रत्येकी 10 हजार इतका निधी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. नवविचारांचा प्रकल्प नाविन्यपूर्ण, समाज उपयोगी असावा, तसेच प्रचलित तंत्रज्ञानापेक्षा तुलनात्मक अधिक फायदेशीर असावा. हा प्रकल्प खर्चिक नसावा तर व्यावहारिक असावा. त्याचप्रमाणे तो पर्यावरण पूरक असावा. प्रकल्पात तोचतोच पणा नसावा . एक लाख नवीन कल्पनातून सर्वोत्तम 10 हजार कल्पनांचे जिल्हास्तरीय तर त्यातील सर्वोत्तम 1 हजार कल्पनांचे राज्यस्तरीय प्रदर्शन भरवले जाते . त्यातील सर्वोत्तम 60 कल्पनांचा विकास केला जातो तसेच उद्योजकता उत्सवामध्ये त्याचे प्रदर्शन भरवले जाते . कोविड 19 काळात महाराष्ट्र राज्यात नामांकनाची संख्या कमी झालेली दिसून आली , त्या तुलनेत इतर राज्यांनी मात्र दरवर्षीपेक्षा अधिक नामांकन सादर केली आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 221 शाळा मानकास पात्र असून अपेक्षित नव कल्पनांची संख्या 1,105 इतकी आहे . प्रत्यक्षात मात्र सप्टेबरपर्यंत 110 नामांकने प्राप्त झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील इन्स्पायर अवार्ड मानक नामांकने वाढावीत यासाठी सर्व शिक्षकांना डायट सोलापूर चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) श्री . भास्करराव बाबर आणि विज्ञान विभाग प्रमुख डॉ. क्रांती कुलकर्णी यांचे तर्फे आवाहन करण्यात येत आहे . नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख दि. 15 ऑक्‍टोबर असून नामांकन सादर करण्यासाठी www.inspireawards dst.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यामध्ये एकच विद्यार्थी अनेक कल्पना सादर करू शकतो. त्यासाठी सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करून त्यांना प्रोत्साहित करावे. अधिक माहितीसाठी विज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख डॉ . क्रांती कुलकर्णी मो.नं. 7620662281 किंवा विज्ञान विभागाचे सहाय्यक श्री . बाळासाहेब वाघ मो.नं. 7020782181 यांचेशी संपर्क साधावा . 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : लोकलने स्टेशन चुकवलं, प्लॅटफॉर्म सोडून २ किमी पुढे थांबली; गाडीतल्या प्रवाशांना रुळावर उतरण्याची वेळ, चूक कुणाची?

MPSC Exam : सोलापूरचा विजय लामकाने प्रथम; महिला प्रवर्गातून आरती जाधव प्रथम

Chhatrapati Sambhajinagar: व्यापाऱ्याचे दोन किलो सोने लंपास; गुजरातच्या तिघांविरोधात गुन्हा, सव्वातीन कोटींची फसवणूक

Silver Trader Death : सांगलीतील 24 वर्षीय चांदी व्यावसायिकाचा कोल्हापुरात संशयास्पद मृत्यू; चांदीच्या पार्सलमध्ये आढळलं तांबं, घटनेने मोठी खळबळ

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT