sarda janm.jpg 
सोलापूर

सुरक्षित जन्म घेण्याची सरड्यांच्या पिलांना अशी मिळाली संधी ! 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः जीवन हे अनमोल असते हा नियम प्राण्यांना देखील लागू होतो. शहरातील बांधकामात सापडलेली अंडी सापाची असतील या भीतीने टाकून दिली असताना योग्य अभ्यासकरून निसर्गप्रेमींनी ही अंडी कृत्रीमरित्या उबवली. त्यातून जीवन मिळालेल्या सरड्याच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात जगण्याची संधी देण्याचे आगळे काम केले. 

कुंभारी गावामधील मल्लिनाथ बिराजदार यांच्या घराचे बांधकाम बांधकामासाठी खड्डा खोदत असताना तेथे जमिनीत काही अंडी दिसली. ही अंडी सापाचे असतील या भीतीने कामगारांनी फेकून देण्याचे ठरविले होते. निसर्ग अभ्यासक मल्लिनाथ बिराजदार हे तेथे पोहचले. लगेचच त्यांनी राहिलेले पाच अंडी बाजूला काढुन ठेवली. त्यांनी सुरक्षितता म्हणून ती अंडी विनय गोटे व अजित चौहान यांच्याकडे सुपूर्द केली. विनय गोटे यांनी नेचर कॉन्झरव्हेशन सर्कलचे संतोष धाकपाडे यांच्याकडे ती अंडी कृत्रिमरीत्या उबवण्यासाठी दिली. निसर्ग अभ्यासक तज्ञ डॉ. प्रतीक तलवाड, डॉ. वरद गिरी आणि शिवानंद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली अंडी उबवण्याची प्रक्रिया समजून घेतली. . 
अंडी कोणत्या प्राण्याची आहेत हे ओळखल्यानंतर त्या प्राण्याची नैसर्गिक अधिवासात अंडी ठेवण्याची पध्दत समजून घेतलीे. सरडा हा प्राणी थोडी वाळू किंवा माती उकरून त्यामध्ये अंडी घालतो. तेथील वातावरणाती उबदारपणा अंडी उबवण्यासाठी उपयुक्त ठरतो. हे लक्षात घेऊन या निसर्गप्रेमींनी वाळु, छोटे दगड ठेवून खेळती हवा व उबदार पध्दतीचे वातावरण या अंड्यांना मिळवून दिले. त्यामुळे अंडी उबवून पिल्ल्यांच्या जन्मासाठी मार्ग मोकळा केला. 

त्या पाच अंड्यातून दोन पिल्ले ऑगस्ट महिन्यात बाहेर पडली. उर्वरित तीन अंड्यातून याच आठवड्यात एक पिल्लू अंड्याबाहेर पडले. त्यानंतर चोविस तासातच दोन पिल्लं बाहेर पडली. तीन अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास 40 आणि 40 दिवसाचा कालावधी लागला. ही सर्व पिल्लं परत निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आली. निसर्ग अभ्यासक तज्ञ डॉ. प्रतीक तलवाड, डॉ. वरद गिरी आणि शिवानंद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यु ट्यूबच्या माध्यमातून माहिती संकलीत करत ही सरड्याचे अंडी कृत्रिमरित्या उबविण्यात आली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT