Chandrabhaga river floods in Pandharpur, stone bridge go under water 
सोलापूर

पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर; जुना दगडी पूल पाण्याखाली 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : नीरा आणि भीमा खोऱ्यात पावसाची संततधार सुरू असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यातच वीर धरणातून नीरा नदीत 41 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे. आज सकाळी नीरेचे पाणी पंढरपुरातील चंद्रभागेत पोचले आहे. त्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. 
नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्यात गेली आहेत. जुना दगडी पूल देखील आज संध्याकाळ पाण्याखाली गेला आहे. भीमा खोऱ्यात आज सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे भीमा आणि नीरा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. शहराला पाणी पुरवठा बंधारा आज दुपारीच पाण्याखाली गेला आहे. तर जुना दगडीपूल पाण्याखाली जाण्यासाठी अवघे काही अंतर शिल्लक आहे. तोही सायंकाळच्या सुमारास पाण्याखाली गेला आहे. जिल्हा प्रशासनाने पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा तालुक्‍यातील भीमा आणि नीरा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
दरम्यान, दोन दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्‍यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. रविवारी (ता.16) सकाळपासून पुन्हा पंढरपूर शहर व तालुक्‍यात पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून येणाऱ्या श्रावणसरीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT