khokho.jpg
khokho.jpg 
सोलापूर

नियमांमध्ये बदल केल्याने प्रो खोखोचा रंगणार थरार ! 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः खो-खो खेळाच्या नियमात केलेल्या बदलाने आता कबड्डीप्रमाणे प्रोखोखोचा थरार रंगणार आहे. खोखो खेळांडूंना देखील प्रोखोखोमुळे नव्या करिअर संधींचे दरवाजे उघडणार आहेत. 

खोखो खेळांचा विस्तार आता वाढत चालला आहे. अगदी शाळास्तरापासून राज्य व राष्ट्रीय पातळीवर या खेळाला मोठी लोकप्रियता मिळु लागली आहे. या खेळाने आता तब्बल चौदा देशामध्ये स्थान पटकावले आहे. वेगवान व सांघिक खेळाच्या कौशल्यामुळे त्याला मोठी संधी उपलब्ध होऊ लागली आहे. या स्थितीत खोखोच्या नियमामध्ये काही बदल करण्याची आवश्‍यक्ता निर्माण झालेली होती. खेळाच्या वेळ कमी होणे, गडी बाद करताना होणारे अडथळे या सह अनेक प्रकारच्या अडचणीचा विचार बदलाच्या संदर्भाने केला गेला. 
अगदी काही मिनीटात सामना खेळणाऱ्या संघाच्या दोन्ही पाळ्या कमीत कमी वेळेत होण्याची गरज होती. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्याने खेळाचा वेग वाढण्याच्या दृष्टीने नियमात बदल केले गेले आहेत. 
आता खोखो खेळाने मिळवलेली आंतराष्ट्रीय मान्यता पाहता प्रोखोखो स्पर्धांना आता कोरोना संकटानंतर थेट सुरुवात होणार आहे. या नियम बदलांचा परिणाम आता पुढील सामन्यामध्ये अनुभवता येणार आहे. या बदलाने कमी कालावधीत वेगवान खेळ हे सुत्र अधिक घट्ट होणार आहे. तसेच गडी बाद होण्याची संख्या देखील वाढणार आहे. अधिकाधिक खेळांडूना त्यांची कामगिरी दाखवण्याची संधी आपोआपच वाढणार आहे. देशातील पहिले प्रो खोखोचे सामने कोरोना काळामुले रद्द झाले तरी ते आता नव्या वर्षात क्रिडा रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. 


वेगवान खेळाची गरज 
खोखोच्या नियमात झालेले बदल काळानुरुप आवश्‍यक होते. त्यामुळे खेळाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. पुढील काळात या बदलाचा फायदा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत होणाऱ्या स्पर्धामध्ये दिसणार आहे. 
- श्रीकांत ढेपे, अध्यक्ष, पंच मंडळ, महाराष्ट्र खोखो असोसिएशन तथा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संघटक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT