Check of every patient in Pandharpur according to corona 
सोलापूर

पंढरपुरात कोरोनाच्या अनुषंगाने प्रत्येक रूग्णाची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे तात्काळ सर्वेक्षण, संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करावी, त्यांच्यात काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ संस्थात्मक क्वारंटाइन करा, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी संबधितांना दिल्या. 
रुग्णालयात तपासणीसाठी आलेला रुग्णांची तपासणी करताना कोरोना पार्श्वभूमीवरच त्यांची आरोग्य तपासणी करावी. यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित करावे. त्यांना आवश्‍यक त्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करावा. रुग्णालयाचे वेळोवेळी निर्जंतुकरण करुन घ्यावे. रुग्णांमध्ये काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालय व एमआयटी कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे, अशा सूचना प्रांताधिकारी ढोले यांनी दिल्या आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, त्या परिसरातील नागरिकांची गतीने आरोग्य तपासणी करावी. कोविड रुग्णांवर उपचार करताना अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रामध्ये निश्‍चित केलेल्या कालावधीत अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त कुणालाही येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरुन या ठिकाणी येता येणार नाही, या बाबत दक्षता घेणे आवश्‍यक असल्याचेही श्री. ढोले यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT