Checking of 90 thousand people in Pandharpur city 
सोलापूर

पंढरपुरातील 90 हजार लोकांची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर कोरोनामुक्त आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. पालिकेच्या वतीने आतापर्यंत शहरातील सुमारे 90 हजार लोकांची तपासणी केली आहे. यामध्ये एकही बाधित किंवा संशयित रुग्ण आढळून आला नाही. शहरातील नागरिकांनी आतापर्यंत जो संयम दाखवला आहे, तो यापुढेही दाखवावा, असे आवाहन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले आहे. 
कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहरातील सध्याच्या परिस्थितीविषयी नगराध्यक्षा भोसले यांनी ही माहिती दिली. 
पंढरपूर शहराची जवळपास एक लाख 25 हजार इतकी लोकसंख्या आहे. त्यात पुणे, मुंबईसह इतर शहरांत राहणाऱ्या लोकांची संख्या देखील जास्त आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहराला मुक्त ठेवण्यासाठी पहिल्यापासूनच पालिकेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली होती. कोरोनोचे वाढते संकट पाहूनच शहरात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तीन दिवस लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन बंद पाळला होता. दोन महिन्यांच्या काळात बाहेरून आलेल्या सुमारे 700 ते 800 लोकांना होम व संस्थांत्मक क्वारंटाइन केले आहे. 
शहरातील लोकांना किराणा साहित्य व भाजीपाला घरपोच मिळावा यासाठी होम डिलिव्हरी ही संकल्पना देखील राबवण्यात आली आहे. शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी सुरवातीपासूनच शहरातील नागरिकांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये शहरातील सुमारे 90 हजार लोकांची तपासणी केली आहे. तपासणीदरम्यान अधिक तापमान असणाऱ्या लोकांना योग्य ती औषधे देऊन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narmada Water: २० वर्षांनंतर महाराष्ट्राला नर्मदा हक्क मिळाला, चार राज्यांमध्ये एकमत; फडणवीसांकडून ऐतिहासिक निर्णयाची घोषणा

Koyna Dam Water Level : कोयना धरणात दहा दिवसातच वाढला 27.77 टीएमसी पाणीसाठा; महाबळेश्वरला 24 तासांत 266 मिमी पाऊस, पाहा धरण आणि तालुकानिहाय आकडेवारी

Latest Marathi News Live Update : नागपुरात सर्वच भागात पावसाला सुरुवात

Pregnancy Test Kit : प्रेग्नन्सी टेस्ट किट नेमकं कसं काम करते? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान

Talegaon Chakan Highway Traffic : तळेगाव-चाकण महामार्गावर वाहतूक कोंडीचा बुधवार; २२ किलोमीटरच्या टप्प्यात तब्बल ७ तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT