Oxygen Palnt
Oxygen Palnt Canva
सोलापूर

राज्यात "मिशन ऑक्‍सिजन'ला सुरवात ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव प्रकल्पाचे उद्‌घाटन

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : संपूर्ण देश कोरोनाचा (Covid) सामना करत आहे. पुढची लाट देशाच्या उंबरठ्यावर आली आहे. अशा परिस्थितीत केवळ कोरोनावरील रुग्णांवर औषधोपचार करताना ऑक्‍सिजन (Oxygen) आधार ठरत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्राने "मिशन ऑक्‍सिजन' (Mission Oxygen) सुरू केले आहे. धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित (Abhijit Patil) पाटील हा तरुण मैलाचा दगड ठरला आहे. धाराशिव कारखान्याने इथेनॉल प्रकल्प (Ethanol project) बंद करून एक प्रकारे नुकसान सोसून ऑक्‍सिजन निर्मिती (Oxygen formation) करण्याचा निर्णय घेतला, ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केले. (Chief Minister Thackeray inaugurates Dharashiv Oxygen Generation Project)

उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी (ता. कळंब) येथील धाराशिव कारखाना हा ऑक्‍सिजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना ठरला असून, त्या प्रकल्पाचे व्हर्च्युअल उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 14) करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, शिखर बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागावकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, व्हीएसआयचे एस. व्ही. पाटील, मौज इंजिनिअरिंगचे संचालक धीरेंद्र ओक, सुनील कागवाड आणि कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पद्धतीने हा सोहळा झाला.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, अभिजित पाटील यांनी ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प केवळ अठरा दिवसांत उभारून तो यशस्वी करून दाखवला आहे. साखर कारखानदारी अडचणीत आलेली असताना पाटील यांनी दाखवलेले धाडस राज्याला नव्हे तर देशाला दिशा दाखवण्याचे कार्य करेल. सर्व देशवासीयांच्या वतीने त्यांचे आभार.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, इथेनॉल प्रकल्पामध्ये तांत्रिक बदल करून ऑक्‍सिजन निर्मिती करणारा धाराशिव हा देशातील पहिला साखर कारखाना आहे, ही अभिनानाची गोष्ट आहे.

अभिजित पाटील म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांच्या आवाहनानुसार कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून हा प्रकल्प उभारण्याचे धाडस आम्ही केले. मौज इंजिनिअरिंग आणि व्हीएसआयचे तांत्रिक सहकार्य आणि कारखान्यातील अधिकारी व संचालक मंडळाच्या अथक परिश्रामुळे यश आले.

यानिमित्त बोलताना जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर आदींनी देखील श्री. पाटील यांचे कौतुक केले.

पाटील यांच्याकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ऑक्‍सिजनचा शोध घेण्यात धाराशिव कारखान्याने बाजी मारली. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तीन हजार मेट्रिक टन निर्मिती करण्याचे राज्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी अभिजित पाटील यांच्याकडून अन्य कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी. ज्या ज्या वेळी देशावर संकट येतं त्या वेळी शेतकरी आणि त्याची लेकरं या देशाच्या मदतीसाठी धावून येतात, हे अभिजित पाटील यांच्या रूपातून आज पुन्हा दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

SCROLL FOR NEXT