The Chief Minister will come for Ashadi Ekadashi 
सोलापूर

आषाढी एकादशीला पूजेसाठी येणार मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून यंदा आषाढी यात्रा भरणार नाही. तथापि आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने आज मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे त्याविषयीचे रीतसर निमंत्रण पाठवले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 


कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 350 वर्षांच्या इतिहास यंदा प्रथमच आषाढी यात्रा भरणार नाही. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी कोणीही वारकरी भाविकाने पंढरपूरला येऊ नये, अशा प्रकारचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमुख संतांच्या पादुका मात्र पंढरपूर येथे आणल्या जाणार आहेत. 


या पार्श्‍वभूमीवर एक जुलै रोजी आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षांपासून आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. या प्रथेनुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक व्हावी, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्वाक्षरीने ई-मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना रीतसर पूजेचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. 


मंदिर समितीच्या निमंत्रणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्‍मी ठाकरे आणि मुलगा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पंढरपूरला येऊन महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करावी. राज्याला कोरोनामुक्त करण्याचे साकडे विठुरायाच्या चरणी घालावे, अशा प्रकारच्या अपेक्षा भाविकांमध्ये व्यक्त होत आहेत. 


मुख्यमंत्री दशमीला सायंकाळी कुटुंबीयांसह हेलिकॉप्टरने पंढरपूरला येतील आणि कोरोना पार्श्‍वभूमीवर मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होईल असे सांगितले जात आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे एका वारकरी दांपत्यास देखील महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान दिला जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

Latest Marathi News Live Updates : दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीमध्ये दमदार हजेरी

loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्‍वासनाचा पडला विसर

Pune Municipal Corporation: आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित; दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप शिल्लक

SCROLL FOR NEXT