सोलापूर

सोलापुरातील प्रशासकीय विसंवाद पोचला "वर्षा' वर 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : सोलापुरातील प्रशासनातील विसंवाद अखेर वर्षा बंगल्यावर पोचला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत त्याची खबर गेली आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशी झूम ऍपद्वारे संवाद साधला. त्यावेळी सोलापुरातील नेते पुरुषोत्तम बरडे यांनी सोलापुरातील प्रशासकीय विसंवाद त्यांच्या कानावर घातला. या प्रकाराबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली. 

सोलापूर शहरातील प्रमुख मोठे हॉस्पिटल कोविड केअर सेंटर साठी ताब्यात घ्यावीत, स्वाब टेस्टिंग ची क्षमता वाढविणे तसेच खासगी रुग्णालयामध्ये टेस्टिंग प्रस्ताव त्वरित मंजूर करावे, नोंदणीकृत रुग्णालायत महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत कोविड रुग्णावर तातडीने उपचार कारावेत, सोलापूर मध्ये प्रशासनामधील अधिकारी यांच्यात सुसंवाद व एकसूत्रता नाही, त्यामध्ये त्वरीत लक्ष घालावे आणि मुंबई पुणे चे धर्तीवर सोलापूर शहरा मध्ये साथीचे रोगीचे निर्मूलनासाठी नवीन सुसज्ज हॉस्पिटल मंजूर करावे त्या साठी अनुदान उपलब्ध करावे, अशा मागण्या श्री. बरडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. 

कोरोना साथचा सोलापुरात प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून काही दिवसानंतर सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांत सुसंवाद होत नसल्याचे स्पष्ट झाले. माध्यमांमध्ये त्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर थोडे दिवस पुन्हा सर्वजण एकत्रित काम केल्यासारखे दिसले, मात्र पुन्हा तीच स्थिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे व्यवस्थित नियोजन केले नसल्यामुळेच त्रयस्थ नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्याची वेळ आली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी एकत्रित व एकमुखी निर्णयाने काम केले तर सोलापुरातील कोरोनास्थितीवर नियंत्रण येऊ शकते, असेही श्री. बरडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Controversy : मोठी बातमी! सातारा SP तुषार दोषींना 'सक्तीची रजा'; मंत्री शंभूराज देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारची कारवाई

बापरे! शुटिंगनंतर समुद्रात गेला अन्...! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, अभिनेत्रीसमोरच घडली धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'लष्कर-ए-तैयबा' या दहशतवादी संघटनेशी संबंधित कुख्यात दहशतवाद्याला अटक

White Squirrel Kolhapur : नेहमीची खार विसरा, ही आहे खास! कोल्हापुरात आढळली चक्क पांढरी शुभ्र खारुताई; काय आहे यामागचं रहस्य?

Satara Chemical Factory Blast : साताऱ्यात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, १० किलोमीटरपर्यंत परिसर हादरला

SCROLL FOR NEXT