सोलापूर

शिरनांदगीत या रोगाचे थैमान

गुरूदेव स्वामी

भोसे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) ः शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथे चिकनगुनिया साथीने थैमान घातले आहे. घरटी एक - दोन रुग्ण आढळत असताना आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने येथील ग्रामस्थांना स्वखर्चाने मंगळवेढा येथे जाऊन खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिरनांदगीकर ग्रामस्थांतून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

महिनाभरापासून शिरनांदगी ग्रामस्थांना चिकनगुनिया ताप, थंडी, अंगदुखी, सांधेदुखी आदी आजाराने पछाडले आहे. शिरनांदगी गाव भोसे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रड्डे उपकेंद्रांतर्गत येते. गावात आरोग्य विभागाचा कर्मचारी अजिबात फिरकत नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महिनाभरापासून शिरनांदगी येथे चिकनगुनियाची साथ पसरली असताना आरोग्य विभागाकडे वेळोवेळी मागणी करून देखील धूर फवारणी, औषध उपचार, लसीकरण आदी कोणत्याही सुविधा रुग्णांना मिळाल्या नाहीत. येथील रुग्णांना स्वखर्चाने मंगळवेढा येथे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांच्या मतदारसंघातील या गावात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे 

रुग्णांची सोय होण्याकरिता भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवकांना गावांत येऊन परिस्थितीची पाहणी करून फवारणी घेण्याविषयी चार ते पाच वेळा सांगितले. आमचे काम नाही, ग्रामपंचायतने फवारणी करावी, अशी उलट उत्तरे ते देतात. आरोग्य विभागाच्या कारभारामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. 
मायाक्का थोरबोले, सरपंच, शिरनांदगी 


शिरनांदगी येथील चिकनगुनियाच्या साथीबाबत ग्रामस्थांकडून माहिती मिळाली आहे. गावात जाऊन तातडीने भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. 
दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आरोग्य समिती सभापती, सोलापूर जिल्हा परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT