03School_20fb_20_20Copy_2.jpg
03School_20fb_20_20Copy_2.jpg 
सोलापूर

पालकांच्या संमतीनंतरच मुलाला शाळेत प्रवेश ! पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून होणार सुरु 

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी पालकांची संमती आवश्‍यक आहे. जिल्हा परिषदमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भातील आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सूचना केल्या. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्यासह तालुकास्तरीय शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.

यु-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण 
कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने यु-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाची सोय केली. जिल्हास्तरावर शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्यासाठी स्टुडिओची निर्मिती केली आहे. मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमासाठी 836 व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून स्टडी वेल ऍपचीही निर्मिती केली आहे. 20 हजार 516 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये 20 हजार 78 डाऊनलोड झाले आहेत.

श्री. स्वामी म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे. या कामासाठी ग्रामपंचायत, शालेय पोषण आहार विभागाची मदत घ्या. माध्यमिकच्या शाळांची स्वच्छता करून घ्या. वर्षभर खोल्या बंद असल्याने दुर्गंधी येऊ नये, संपूर्ण स्वच्छता व्हावी, यासाठी खोल्या उघड्या ठेवण्याच्याही सूचनाही त्यांनी केल्या. कोरोनाविषयक सर्व खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांसाठी मास्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शिक्षकांनी पालक आणि विद्यार्थ्यांची मते जाणून घ्यावीत. पालक सभा घेऊन त्यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे पटवून द्या. पालक ग्रुप, ग्राम शिक्षण समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागरण करण्यात येणार. शिक्षकांसह पालकांनीही आपल्या मुलांची काळजी घ्यावी. कमी दप्तर, डबा, सॅनिटायझर, मास्क धुणे, हात धुणे याबाबत मुलांना पालकांनीही समजावून द्याव्यात. मुलांना खेळताना, शाळेत बसताना इतर मुलांपासून शारिरीक अंतराचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

आकडे बोलतात... 

  • जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या एकूण शाळांची माहिती 
  • एकूण शाळा : 2 हजार 153 
  • कार्यरत शिक्षक : 8 हजार 236 
  • पाचवी ते आठवीचे विद्यार्थी : तीन लाख 4 हजार 527 
  • विद्यार्थ्यांची संख्या : 1 लाख 61 हजार 291 
  • विद्यार्थिनींची संख्या : 1 लाख 43 हजार 236  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT