बालविवाह प्रतिबंध संदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अशोक सायकर
बालविवाह प्रतिबंध संदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अशोक सायकर Sakal
सोलापूर

बालविवाह रोखणे काळाची गरज : पोलीस निरीक्षक सायकर

राजकुमार शहा

मोहोळ - बालविवाहाचे प्रमाण ग्रामीण भागात जादा आहे, बालविवाहामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते तसेच तिला अनेक शारीरिक व्याधीना ही सामोरे जावे लागते. त्यासाठी तिच्या आई वडिलांचे प्रबोधन करून बालविवाह रोखणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी केले.

मोहोळ पोलीस ठाण्यातर्फे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंम्मत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली "बालविवाह प्रतिबंध अभियान" हा उपक्रम हाती घेतला असून त्याची सुरुवात पापरी ता मोहोळ येथुन करण्यात आली त्यावेळी ग्रामस्थांना पोलीस निरीक्षक सायकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी शंकर कोळी, उपसरपंच अमोल पाटील, गावकामगार पोलीस पाटील प्रशांत पाटील, सहाय्यक फौजदार लोबो चव्हाण यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक सायकर पुढे म्हणाले, तालुक्यात 104 गावे आहेत ज्या गावात बालविवाह झाले आहेत त्या गावात अगोदर प्रबोधन करण्यात येणार असून, उर्वरित गावातही प्रबोधन करण्यात येणार आहे. त्या-त्या गावच्या ग्रामसेवकाची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, अंगणवाडी सेविका या त्यांना मदतनीस म्हणून काम करणार आहेत.या उपक्रमासाठी विषेश ग्रामसभेचे आयोजन करून त्यात बालविवाह रोखण्या संदर्भात ग्रामपंचायतीने तसा ठराव करावयाचा असुन नागरीकांना शपथ देण्याची आहे .बालविवाह होत आहे याची माहिती असूनही बालविवाह प्रतिबंध अधिकारी व मदतनिसांनी दुर्लक्ष केल्यास त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

गावात एखादा बालविवाह होत असेल तर त्याची माहिती पोलीस ठाण्याला किंवा गावपातळीवरील अधिकाऱ्यांना द्यावी या प्रक्रियेत अधिकाऱ्यासह गावकर्‍यांची ही जबाबदारी तेवढीच असल्याचे पोलीस निरीक्षक सायकर यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांतर्फे पोलीस निरीक्षक सायकर, सहाय्यक फौजदार लोबो चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT