child 
सोलापूर

कोरोनाच्या हल्ल्यात मुलं सुखरुप, ज्येष्ठांची उडाली झोप : 0 ते 15 वयोगटाचे सर्वांनाच पडले कोडे 

प्रमोद बोडके

सोलापूर : गाव असो की शहर...सध्या सर्वांच्याच तोंडी फक्त कोरोनाचाच विषय आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आता ग्रामीण भागही असुरक्षित झाला आहे. कोरोनाच्या रडारवर युवक, ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराच्या व्यक्ती असताना शुन्य ते 15 वयोगट मात्र सुखरुप असल्याचे आजपर्यंतच्या आकडेवारीतून समोर आले आहे. घरातील आई-वडील असो की आजी-आजोबा या सर्वांशीच या वयोगटाचा ( शून्य ते 15) सर्वाधिक संपर्क असतानाही त्यांना कोरोनाचा फारसा धोका नसल्याचे आजपर्यंतच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 

अनेक घरातील ज्येष्ठ व्यक्ती कोरोनाबाधित होतात परंतु त्याच घरातील लहान मुले (शून्य ते 15 वयोगट) कोरोनाबाधित का होत नाहीत? याचे कोडे अनेकांना पडले आहे. घरातील व्यक्तींसोबत सर्वाधिक संपर्क असून देखील लहान मुलांना इतर वयोगटाच्या तुलनेत संसर्ग होत नाही आणि झालाच तरीही ते लवकर बरे कसे होतात? या प्रश्‍नाची उत्तरे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. शकिरा सावस्कर यांनी याबाबतची उपयुक्त माहिती दिली.

14 ऑगस्टपर्यंत महापालिकेच्या हद्दीतील एकूण बाधितांची संख्या 5 हजार 743 होती. त्यामध्ये शून्य ते 15 वयोगटातील 543 (9.45 टक्के), 16 ते 30 वयोगटातील 1297 (22.58 टक्के), 31 ते 50 वयोगटातील 1906 (33.19 टक्के), 51 ते 60 वयोगटातील 906 (15.78 टक्के) व 60 वर्षावरील 1091 (19 टक्के) बाधितांचा समावेश आहे. 14 ऑगस्टपर्यत महापालिका हद्दीतील 389 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शून्य ते 15 वयोगटातील एकाही मुलाचा/मुलीचा समावेश नाही. 

जशी स्थिती महापालिका हद्दीतील आहे तशीच स्थिती जिल्हा परिषद हद्दीतील बाधितांचीही आहे. 14 ऑगस्टपर्यंत ग्रामीण भागात सात हजार 60 बाधित आढळले आहेत. त्यापैकी शून्य ते 15 वयोगटातील 734 (10.4 टक्के), 16 ते 50 वयोगटातील 4 हजार 445 (63 टक्के), 51 ते 59 वयोगटातील 848 (12 टक्के), साठ वर्षावरील 1033 (14.6 टक्के) बाधित आढळले आहेत. ग्रामीण भागात 14 ऑगस्टपर्यंत 197 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शून्य ते दहा वर्ष वयोगटातील फक्‍त एका रुग्णाचा समावेश आहे. 

  • डॉ. सावसकर म्हणतात यामुळे लहान मुलांना कमी धोका 
  •  सध्या लहान मुले घरीच असल्याने ते एक प्रकारचे होते होम आयसोलेशन 
  •  लहान मुलांची प्रतिकार शक्ती पूर्णता विकसित झाली नसल्याने संसर्ग झाला तरीही त्याची प्रखरता कमी 
  • मानवी शरिरातील एसीई - 2 नावाच्या रिसेप्टरवर प्रभाव दाखवितो आणि मग पसरतो, लहान मुलांमध्ये रिसेप्टर पूर्णपणे विकसित नसतात 
  • सर्दी, ताप, खोकल्याचे लहान मुलांमध्ये प्रमाण जास्त असल्याने या विषाणू विरोधात लढण्याची निर्माण होते प्रतिकार शक्ती 
  • बारा वर्षाच्या आतील मुलांना इतर लसीकरण वेळेवर केल्याने विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्‍यता कमी 
  • स्थिती महापालिकेची 
  • एकूण बाधित : 5743 
  • 0 ते 15 वयोगटातील बाधित : 543 
  • एकूण बाधितांच्या तुलनेत : 9.45 टक्के 
  • सर्वाधिक बाधित : 31 ते 50 वयोगट - 33.19 टक्के 
  • (स्थिती : 14 ऑगस्टपर्यंतची)
  •  
  • स्थिती जिल्हा परिषदेची 
  • एकूण बाधित : 7060 
  • 0 ते 15 वयोगटातील बाधित : 734 
  • एकूण बाधितांच्या तुलनेत : 10.4 टक्के 
  • सर्वाधिक बाधित : 16 ते 50 वयोगट - 63 टक्के 
  • (स्थिती : 14 ऑगस्टपर्यंतची)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT