Tisangi Fire 
सोलापूर

शाब्बास ! आगीपासून बाल चिमुकल्यांनी वाचवली तिसंगी फॉरेस्टमधील हजारो झाडे 

संजय हेगडे

तिसंगी (सोलापूर) : तिसंगी (ता. पंढरपूर) परिसरात फॉरेस्ट विभागाचे 53 हेक्‍टर क्षेत्र असून, मंगळवारी (ता. 1) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारात या फॉरेस्टला आग लागल्याने आगीत दोन हजार रोपे जळून खाक झाली तर 38 हजार रोपे वाचविण्यात यश आले आहे. आग विझविण्याचे मोठे काम तिसंगीतील बाल चिमुकल्यांनी केले आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, हे समजू शकले नाही. याचा तपास वन अधिकारी करीत आहेत. 

झाडे ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे संरक्षण करणे हे आपले काम आहे. मंगळवारी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वन क्षेत्राला आगली. हे आग विझवण्याचे काम तिसंगी येथील चिमुकल्यांनी हातांना चटके बसत असतानाही मोठ्या धाडसाने केले. ही आग विझली नसती तर वणवा पेटून किती हजार झाडे जळून भस्मसात झाली असती, याची कल्पना करवणार नाही. या चिमुकल्यांचे कार्य कौतुकास्पद असेच आहे. 

ही आग विझवणारे ऍड. वैभव चंदनशिवे यांच्यासह निखिल कांबळे, सिद्धार्थ चंदनशिवे, प्राजक्ता चंदनशिवे, सायली चंदनशिवे, प्रथमेश चंदनशिवे, आर्यन बाबर या चिमुकल्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या चिमुकल्यांना शासकीय यंत्रणेने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

माझ्या घराच्या जवळ वनक्षेत्र असून, अचानक आग लागल्याचे दिसले. वनविभागाच्या अधिकारी वर्गास फोन केला, पण एकही अधिकारी आला नाही. मी लहान चिमुकल्यांना घेऊन आग विझवली. हजारो रापे वाचवली. 
- ऍड. वैभव चंदनशिवे, तिसंगी 

आग विझवत असताना चटके बसत होते. पण आग विझवली नाही तर जंगल जळून जाईल, म्हणून धाडस करून झाडांच्या फांद्यांनी आग विझवली. 
- प्राजक्ता चंदनशिवे, तिसंगी 

तिसंगी परिसराला वरदान ठरलेले उंबरगाव, शिरभावी, हलदहिवडी परिसरात मोठे वनक्षेत्र आहे. यांचे संरक्षण करणे अधिकारी वर्गाची जबाबदार असून, याचे पालन होत नाही. त्यामुळे आग लागली. अधिकारी वर्गाचे या परिक्षेत्राकडे दुर्लक्ष आहे. 
- प्रा. अशोक पवार, वृक्षप्रेमी, तिसंगी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

SCROLL FOR NEXT