Siddheshwar Sugar Factory Chimney esakal
सोलापूर

Siddheshwar Factory : 'कारखान्याची चिमणी जमीनदोस्त; सोलापूरची विमानसेवा महिन्यात सुरू होणार'

सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) अनधिकृत को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

कारखान्याच्‍या बेकायदेशीर चिमणी विरुध्द विचार मंचने चार ते पाच वर्षे न्यायालयीन लढाई लढून यश मिळवले.

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) अनधिकृत को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. त्यामुळे सोलापूर शहराचा विकासाचा मार्ग सुकर होणार आहे. सोलापूरच्या विकासाला, उद्योगधंद्यांना गरज असणारी विमानसेवा एक महिन्याच्या आत सुरू होणार आहे, अशी माहिती सोलापूर विचार मंचच्यावतीने डॉ. संदीप आडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी संवाद साधताना डॉ. आडके म्हणाले, सिद्धेश्वर साखर कारखान्याची को-जनरेशनची चिमणी पडल्यामुळे कारखान्याच्या गाळप हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. कारखान्यात अस्तित्वातील दोन जुन्या चिमण्यांवर प्रतिदिन पाच हजार टन क्षमेतेने गाळप होऊ शकते.

कारखान्याच्‍या बेकायदेशीर चिमणी विरुध्द विचार मंचने चार ते पाच वर्षे न्यायालयीन लढाई लढून यश मिळवले. चिमणीच्‍या राजकारणाबद्दल डॉ. आडके यांनी माहिती दिली. याप्रसंगी मंचचे विठ्ठल वठारे, डॉ. डायना आडके, रघुनंदन भुतडा आदी उपस्थित होते.

कारखाना दत्तक द्या; उत्तमरित्या चालवून दाखवू

सिध्देश्‍वर कारखान्याची सूत्रे जबाबदार व्यक्तीकडे सोपवल्यास कारखाना भविष्यात वाचू शकतो. कारखाना आम्हाला चालवायला द्या, आम्ही कारखाना दत्तक घ्यायला तयार आहोत. येत्या हंगामापासून तो उत्तमरित्या चालवून दाखवू, असा दावा मंचच्या वतीने करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

Women's ODI World Cup 2025 SF Scenario : १ जागा, पाच स्पर्धक! भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अन् न्यूझीलंड कसे पोहोचणार उपांत्य फेरीत?

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

Marriage Fraud : लग्नानंतर काही मिनिटांतच वधू भूर्रर्र...; नाशिकच्या शेतकरी तरुणाला चार लाखांना गंडवले, काही क्षणांत स्वप्नांचा झाला चुराडा

SCROLL FOR NEXT