4shangrao1.jpg 
सोलापूर

'सिध्देश्‍वर'ची चिमणी पडणारच ! कारखान्याकडून वसूल होणार पाडकामाची रक्‍कम; 50 लाख रुपये लागतील

तात्या लांडगे

सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळ परिसरातील श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडकामाची कार्यवाही महापालिकेने हाती घेतली आहे. निविदा प्रसिध्द केल्यानंतर आता पाडकामाची रक्‍कम निश्‍चित केली जात आहे. संबंधित मक्‍तेदारांकडून पुरेशा कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. त्याची पूर्तता झाल्यानंतर एक मक्‍तेदार निश्‍चित करुन चिमणी पाडकाम केले जाणार आहे. पाडकामासाठी लागणारी संपूर्ण रक्‍कम कारखान्याकडूनच वसूल केली जाईल, असे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच कार्यवाही 
होटगी रोडवरील विमानतळासाठी विविध प्रकारचे अडथळे असून त्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याची चिमणी आहे. चिमणीचा अडसर दूर झाल्यानंतर सोलापूर- हैदराबाद ही विमानसेवा सुरु होईल, अशी चर्चा आहे. तर केंद्र सरकारच्या 'उडान' योजनेत सोलापूरचा समावेश असतानाही ही योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही. चिमणीचा अडसर दूर झाल्यानंतर ही योजना सोलापुरसाठी लागू होईल, असा विश्‍वासही व्यक्‍त केला जात आहे. दरम्यान, कारखान्याने चिमणी पाडकामाच्या कार्यवाहीला न्यायालयातून स्थगिती मिळविली तरच कार्यवाही थांबेल, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची चिमणी पाडली जाईल, असेही आयुक्‍त पी. शिवशंकर म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्यानंतर सिध्देश्‍वर साखर कारखान्याची चिमणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. होटगी रोडवरील विमानतळासाठी प्रमुख अडथळा ठरणाऱ्या चिमणीचे पाडकाम केले जाणार आहे. तत्पूर्वी, महापालिकेने निविदा काढून नाशिक येथील मक्‍तेदाराला चिमणी पाडकामाचे काम दिले होते. मात्र, त्यांनी काम करण्यास नकार दर्शविल्याने महापालिका प्रशासनाने आता नव्याने निविदा काढली आहे. चार मक्‍तेदारांनी त्यासाठी निविदा भरली असून त्यांच्याकडून पुरेशा कागदपत्रांची पूर्तता व्हावी, यासाठी मुदत देण्यात आली आहे. चिमणी पाडकामासाठी सुमारे 50 लाख रुपये लागणार आहे. प्रारंभी ही रक्‍कम महापालिकेतर्फे मक्‍तेदाराला दिली जाणार असून त्यानंतर ती रक्‍कम कारखान्याकडून वसूल केली जाणार आहे, असेही आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT