chintamani jagtap  esakal
सोलापूर

बागल गटाचे चिंतामणी जगताप यांचे बाजार समिती संचालक पद रद्द

जगताप यांचे संचालक पद रद्द होणे हे बागल गटासाठी धक्का आहे.

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

जगताप यांचे संचालक पद रद्द होणे हे बागल गटासाठी धक्का आहे.

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिला आहे.

चिंतामणी जगताप हे बागल गटाकडून बाजार समितीचे संचालक झाले आहेत. जगताप यांचे संचालक पद रद्द होणे हे बागल गटासाठी धक्का आहे. तर माजी आमदार जगताप गटात मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंतामणी जगताप यांच्याकडे करारान्वये बाजार समितीचा नोंदणीकृत भूखंड असून त्यांनी त्याचे भाडे देखील भरलेले नाही. सबब समितीशी प्रत्यक्ष करार व थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र घोषित करून बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेबाबत जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था सोलापूर यांच्याकडे ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत अपील दाखल केले होते.

या अपीलावर लेखी व तोंडी युक्तिवाद, सुनावणी होवून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी चिंतामणी जगताप यांना अपात्र घोषित करीत त्यांचे बाजार समिती सदस्यत्त्व रद्दबातत ठरविले आहे. चिंतामणी जगताप हे बाजार समिती संचालक असण्यासाठी अपात्र ठरत असल्याने त्यांना आदेशाच्या तारखेपासून म्हणजेच 21 ऑक्टोंबर 2021 पासून सदस्य पदावरून कमी करण्यात येत असले बाबत देखील आदेशात म्हटले आहे. या अपीलामध्ये अर्जदार शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या वतीने ॲड. कमलाकर वीर, चिंतामणी जगताप यांचे वतीने ॲड. राऊत व त्रयस्थ अर्जदार सभापती बंडगर यांच्या वतीने ॲड. दुरगुडे यांनी कामकाज पाहीले.

ज्या दिवशी देशभक्त कै.नामदेवराव जगताप पुतळ्याचे अनावरण झाले. त्याच दिवशी आपले सर्वार्थ राजकीय हेतू फिटले, माजी सचिव शिंदे व इतर कर्मचारी यांनी बनवट दस्त तयार करून हे प्रकरण दाखल केले आहे. 1999 साली अंङरटेबल पैसे घेवून मला अधीग्रहीत झालेला प्लॉट दिल्या बद्दल फसवणुकीचा फौजदारी दावा दाखल करणार आहे. आम्ही राजकीय दबाव टाकायला कमी पडलो, ज्याईन्ट रजिस्टर पुणे यांच्याकङे दाद मागणार आहोत.

- चिंतामणी जगताप, करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT