Police 
सोलापूर

पोलिस ठाणे पुढाऱ्यांच्या मर्जीवर चालते का? आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलाचा सवाल 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : शेळवे (ता. पंढरपूर) येथील एका कॉलेज विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी एका सामाजिक महिला पदाधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात फोन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. पुढाऱ्यांच्या मर्जीवरच पोलिस ठाणे चालते का, असा संतप्त सवाल मृत मुलीचे वडील सत्यवान गाजरे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी रमेश गाजरे, लहू टेलर आणि स्वप्नील कौलगे यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

शेळवे येथील अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या स्वप्नाली सत्यवान गाजरे (वय 17) या अल्पवयीन विद्यार्थिनीने गावातील टवाळखोर तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून ता. 6 रोजी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण गावातील काही पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने दडपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मृत स्वप्नालीने लिहिलेली सुसाईड नोट ता. 9 रोजी तिचे वडील सत्यवान गाजरे यांना शाळेच्या बॅगमध्ये सापडल्याने या आत्महत्येचा उलगडा झाला. 

याबाबत मृत मुलीचे वडील सत्यवान गाजरे यांनी सांगितले, की आत्महत्येचा प्रकार घडल्यानंतर फिर्याद घेण्यास पोलिसांनी तब्बल तीन दिवस उशीर केला. पोलिस एवढ्यावरच थांबले नाहीत तर माझ्या तक्रारीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गावातील पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने झाला प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु सामाजिक कार्यकर्ता यांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तीन दिवसांनी माझी फिर्याद दाखल करून घेतली. सर्वसामान्य लोकांना पोलिसांत न्याय मिळाला पाहिजे. 24 तासांत फिर्याद दाखल करून घेतली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. पंढरपूरचे ग्रामीण पोलिस ठाणे हे काही पुढाऱ्यांच्या मर्जीवर चालते का, असा संतप्त सवालही सत्यवान गाजरे यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, आरोपींना मदत करणाऱ्या गाव पुढाऱ्यांची आणि उशिरा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणीही मृत मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. मृत मुलीच्या वडिलांनीच पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याने ग्रामीण पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

फिर्यादी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास आले असता, त्यांची रीतसर तक्रार दाखल करून घेतली आहे. यामध्ये तीन दिवसांनी तक्रार दाखल करून घेतली म्हणणे योग्य वाटत नाही. मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित तीन आरोपींना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी संबंधित तक्रारीनुसार पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल. 
- विक्रम कदम,
उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाताना BMW कोस्टल रोडवरून कोसळली; तिघांचा मृत्यू, पोलिस काय म्हणाले?

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT