Citizens did not come to Morning Walk in Solapur because of Corona 
सोलापूर

कोरोना : गर्दी टाळण्यासाठी असे करा मॉर्निंग वॉक (Video)

सुस्मिता वडतिले

सोलापूर : जीवनशैलीतील बदलांमुळे सकाळी फिरणे हे सुदृढ आरोग्यासाठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाण्यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात कल पहावयास मिळायचा, परंतु सध्या कोरोना व्हायरसमुळे नेहमी गजबजलेले शहर आता सामसूम पहावयास मिळत आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात सुद्धा बदल झाला आहे. काहींनी गर्दी टाळण्यासाठी वेळेत बदल केला असल्याचे चित्र दिसत आहे.
पूर्वी नागरिक आवड म्हणून सकाळी फिरायला जात असत. परंतु आता आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नागरिकांनी मॉर्निंग वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉक करण्यासाठी शहराच्या चारही बाजूंची रस्ते सकाळी माणसांनी फुललेले असतात. परंतु कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे ही अवघड झाले आहे. त्यामुळे किल्ला बाग, खंदक बाग, विनकर बाग, कन्ना चौक, महापालिका परिसर, गणपती घाट, डफरीन चौक, होम मैदान, दयानंद महाविद्यालय परिसर, कंबर तलाव, विजयपूर रोड, जुळे सोलापूर आदी परिसर हे मॉर्निंग वॉक करण्यासाठी नेहमी गजबजलेले पहावयास मिळत असायचे. परंतु हेच परिसर सध्या कोरोनामुळे रिकामे दिसत आहे. जेमतेम नागरिक रोजच्या सवयीप्रमाणे एक दोन

फूटाचे अंतर ठेवून मॉर्निंग वॉक करत आहेत. सद्यस्थितीत मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. यामुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागली आहे. मानसिक ताण अशा  अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांना आळा घालण्याच्या हेतूने अनेकांनी मॉर्निंग वॉकचा आधार घेतलेले चित्र आपल्याला सर्वत्र पहावयास मिळत आहे. गर्दी टाळण्यासाठी या वेळेत काहींनी बदल केल्याचे दिसत आहे.

गर्दी कमी झाली
कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडणे बंद केले आहे. रोज मॉर्निंग वॉक करण्यासाठी जी गर्दी असायची ती सध्या बंद झाली आहे. मला मॉर्निंग वॉक केल्याने दिवस प्रसन्न वाटतो. स्वभावात परिवर्तन होऊन सकारात्मक भावना वाढीस लागते, त्यामुळे आम्ही नित्यनेमाने मॉर्निंग वॉक करतो.
- भिमाशंकर लिंगशेट्टी

मॉर्निंग वॉकचा रस्ता बदलला

अनेक वर्षांपासून बागेत मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात होतो. परंतु सध्या कोरोनामुळे बाग बंद ठेवल्यामुळे आम्हाला मॉर्निंग वॉकचा रस्ता बदलावा लागला तरीही आम्ही रोज न चुकता मॉर्निंग वॉक करण्यास जात आहोत.
- रेणुका रेवणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

SCROLL FOR NEXT