सोलापूर

या शहरात कॉंग्रेसचा आहे लॉकडाऊनला विरोध

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन केल्यामुळे अनेकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. अनेक कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्यास शहर युवक कॉंग्रेसने विरोध केला आहे. लॉकडाऊन पुन्हा नको अशी मागणी युवकचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

शहरात दोन-अडीच महिने लॉकडाऊन होता. या काळात नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. काही प्रमाणात सामाजिक संस्था आणि सरकारी नागरिकांनी सहकार्य केले होते. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब, बांधकाम कामगार, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार यांची खूप अडचण झाली. पैसे नसल्यामुळे अनेक रुग्ण, भाडेकरु नागरिक, बचतगटाचे हफ्ते असणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. 

शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशी सर्वत्र चर्चा आहे. प्रशासनाच्या वतीनेही तसे वक्तव्य करण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास गोरगरीब जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. सोलापूरपेक्षा कित्येक पटींनी मोठे असलेल्या नागपूर येथे योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्याने मृत्युसंख्या रोखण्यात यश आले आहे. अशा प्रकारचे नियोजन शहरात करून कोरोना आटोक्‍यात आणावा. काहीही झाले तरी पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ नये, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, सुमित भोसले, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, उपाध्यक्ष राजासाब शेख, संजय गायकवाड, बाबूराव क्षीरसागर, महेश लोंढे, शाहु सलगर, शरद गुमटे, सुभाष वाघमारे, आकाश गायकवाड़, उमेश बेरे, नागनाथ जोगलेकर, श्रीकांत म्हेत्रे, सद्दाम शेख, भगवान कंगाळे, किरण चंदनारे, सौरभ सालुंखे, राज शिंदे, भगवान करगुळे उपस्थित होते. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT