logo 
सोलापूर

सोलापूरच्या भैय्या चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरलेल्या भैय्या चौकातील रेल्वे उड्डाण पुलाच्या प्रश्न आता मार्गी लागला आहे. महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाने उड्डाण पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनीचा आगावू ताबा दिल्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. 

भय्या चौकातील या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचे प्रस्ताव मंजूर आहेत. मात्र पोहोच रस्त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनीचा ताबा न मिळाल्याने हे काम प्रलंबित होते. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबत राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांनी वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांच्याशी याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली. त्यानंतर श्री. गोविंदराज यांनी एनजी मिलच्या ताब्यातील सिटी सर्व्हे क्रमांक 8467 आणि 8468 या दोन गटातील 5 हजार 675 चौरस मीटर जागा पोहोच मार्गाचे काम करण्यासाठी द्यावी, अशा सूचना त्यांनी वस्त्रोद्योग महामंडळाला दिल्या.

याबदल्यात महापालिका वस्त्रोद्योग महामंडळाला टिडीआर देणार आहे. याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांना सांगितले. 
या उड्डाणपुलाचे आयुष्य संपुष्टात आल्याचे रेल्वे विभागाने यापूर्वीच महापालिकेला कळवले आहे. त्यावेळी हा पूल तोडून त्याजागी दोन लेनचे दोन नवीन पूल उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सोलापूर-मंगळवेढा महामार्गाच्या कामास सुरवात झाली आहे. या दोन पुलाचे काम लवकरच सुरू करून येत्या दहा महिन्यात पूर्ण केले जाईल, असे श्री. कदम यांनी सांगितले.

याकामासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून पाठपुरावा केला होता. उड्डाण पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी आवश्‍यक असणारी जागा महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. ती जागा महापालिकेच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केली जाणार होती. इतक्‍या प्रक्रियेला विलंब लागला असता. हा विलंब टाळण्यासाठी जमिनीचा आगावू ताबा देण्यात आला आहे, असे श्री. कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

LPG New Connection Update : नवीन एलपीजी कनेक्शनसाठी बुकिंग कधीपासून सुरू होणार? सरकारने स्पष्ट केली स्थिती

Central Railway: कोकणकरांसाठी आनंदवार्ता! मुंबई-मडगावदरम्यान गणपती विशेष गाड्या; कुठून, कधी धावणार ट्रेन?

‘फुलों का तारों का’ गाण्याची भन्नाट गोष्ट! लता मंगेशकरांनी काढला चक्क 10 वर्षांच्या मुलाचा आवाज

Marathi News Live Updates : नेपाळमधील महापुराची परिस्थिती अत्यंत गंभीर; ओवेसींकडून मदतीचे आवाहन

SCROLL FOR NEXT