Pandharpur Vitthal Temple decision  
सोलापूर

भाजप आमदार म्हणतायेत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद; मंदिर मात्र सुरुच 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर बंद करण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे सदस्य व भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईत केली आहे. उद्या या संदर्भात मंदिर समितीची पंढरपूर येथे बैठक होणार होती, तत्पूर्वी श्री. कदम यांनी मुंबईतून याची घोषणा केली आहे. 
कोरोनाची साथ वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून काही दिवसापुरते विठुरायाचे पूर्ण दर्शन बंद करावे किंवा किमान पदस्पर्श दर्शन बंद करून केवळ मुखदर्शन सुरू ठेवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली होती. 
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ घोषित केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी जगभरात विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. 
कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही दिवस राज्यातील शासकीय कार्यक्रम, यात्रा, उत्सव बंद करावेत असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 
त्याची दखल घेऊन तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी , परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथ, मुंबईतील सिद्धिविनायक, शेगाव मधील श्री संत गजानन महाराज, श्रीक्षेत्र ज्योतिबा येथील दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच शिर्डी येथील संस्थांना देखील दुपारपासून दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
दरम्यान श्रीविठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीची उद्या 18 मार्चला या संदर्भात पंढरपूर येथे बैठक होणार होती. या बैठकी आधीच आज समितीचे सदस्य आमदार राम कदम यांनी दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुंबई येथे केली आहे. यासंदर्भात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांना विचारले असता "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, विश्वस्त आमदार राम कदम यांनी घोषणा केली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत निर्णय देण्यात आलेला नाही. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, भोसले घराण्याची उच्च न्यायालयात धाव, समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही!

Mexican Style Street Corn Salad: सकाळच्या नाश्त्याला द्या झणझणीत पण हेल्दी ट्विस्ट! बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड

SCROLL FOR NEXT