Pandharpur Mahapuja esakal
सोलापूर

Pandharpur Mahapuja : मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सुरुवात; मंत्र्यांसह खासदार पूजेला उपस्थित

Pandharpur Mahapuja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांसोबत यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे.

Pandharpur Mahapuja : आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला आहे. आज जवळपास 15 लाखाहून अधिक भाविक वारीसाठी दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. आज मध्यरात्रीपासून भाविकांनी पवित्र चंद्रभागा स्नानाची पर्वणी साधण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

दरम्यान, आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सुरुवात झाली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह अनेक मंत्री-खासदार देखील या महापूजेसाठी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. अहिरे हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन गावचे रहिवाशी असून ते मागील 16 वर्षांपासून नियमित पंढरीची वारी करत आहेत. दरम्यान, आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. दरम्यान, पश्चिम द्वारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रेटारेटी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

SCROLL FOR NEXT