corona treatment 
सोलापूर

जिल्हाधिकारी म्हणाले, "येथील' कोरोना रुग्णांवर टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार होणार उपचार 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्‍यात सध्या तरी लॉकडाउनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पुढच्या काही दिवसांत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. पंढरपुरातील करोनाबाधित रुग्णांवर टास्क फोर्स समितीच्या सल्ल्यानुसार उपचार केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतील, याविषयी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख प्रशासकीय व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. बैठकीमध्ये कोरोना संसर्ग कमी करण्यासंबंधित चर्चा झाली. या वेळी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. बैठकीपूर्वी त्यांनी शहरातील अधिग्रहित करण्यात आलेल्या खासगी हॉस्पिटलची पाहणी करून संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांशी चर्चा केली. 

बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की पंढरपूर शहर व तालुक्‍यातील कोरोना रुग्णांवर पंढरपुरातच उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी काही खासगी हॉस्पिटल अधिग्रहण केली आहेत. त्या ठिकाणी हे उपचार सुरू केले जाणार आहेत. इतर आजारांच्या रुग्णांसाठी देखील स्वतंत्रपणे उपचाराची सोय केली जाणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पंढरपुरात टास्क फोर्स (वैद्यकीय तज्ज्ञ समिती)ची मदत घेतली जाणार आहे. या समिती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. ठाकूर यांचा विशेष सल्ला आणि मार्गदर्शन घेतले जाणार आहे. याबाबत डॉ. ठाकूर यांनी आज काही डॉक्‍टरांशी चर्चा करून त्यांना उपचारासंबंधी सल्ला आणि सूचनाही केल्या. पंढरपूर शहर व तालुक्‍यात लॉकडाउन जाहीर करण्याबाबत आज तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. लॉकडाउनबाबत स्थानिक प्रशाकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. पुढच्या काही दिवसांत यावर चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

बैठकीला आमदार भारत भालके, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, डॉ. जयश्री ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT