Solapur University 
सोलापूर

अंतर्गत गुणांमुळे अडकला विद्यार्थ्यांचा निकाल ! विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली 20 फेब्रुवारीची डेडलाइन 

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रथम वर्ष वगळता अन्य वर्गांच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेतली. ही परीक्षा ऑनलाइन पार पडली. परीक्षा होऊन काही दिवस झाले, मात्र 29 महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण विद्यापीठाला दिले नाहीत. त्यामुळे निकालाची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाला ऑनलाइन घ्यावी लागली. त्यानंतर विद्यापीठाने सत्र परीक्षाही ऑनलाइनच घेतली. त्यात तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी 70:30 तर द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी 40:10 चा पॅटर्न ठेवला होता. त्यानुसार महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण विद्यापीठाला वेळेत देणे आवश्‍यक आहे; जेणेकरून निकाल वेळेत जाहीर करता येईल आणि विद्यार्थ्यांना आगामी सत्राच्या दृष्टीने तयारी करणे सोयीस्कर होईल, असा त्यामागे हेतू आहे. मात्र, अद्याप विद्यापीठाशी संलग्नित 29 महाविद्यालयांनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण न दिल्याने सर्वच विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवावा लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना स्वतंत्र पत्र काढून 20 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण पाठविण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. कोरोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी विद्यापीठ घेत आहे. आता अंतर्गत गुण विद्यापीठाला न कळविणारी महाविद्यालये वेळेत विद्यापीठाला माहिती देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आकडे बोलतात... 

  • विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये : 108 
  • परीक्षा दिलेले विद्यार्थी : 60,000 
  • परीक्षा झालेली तारीख : 12 फेब्रुवारी 
  • अंतर्गत गुणांसाठी मुदत : 30 

अंतर्गत गुण मिळाल्यानंतर जाहीर होईल निकाल 
कोरोना काळात प्रथमच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र परीक्षाही ऑनलाइन आणि लवकर घेतल्या आहेत. आता महाविद्यालयांकडून अंतर्गत गुण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल. 
- श्रेणिक शहा, 
परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT