political. 
सोलापूर

गावाच्या एकीत बेकी नको; मात्र ग्रामपंचायती बिनविरोधामध्ये गावकी, भावकी व राजकारण ठरतेय अडसर !

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आचारसंहिता लागू झाली आहे. बार्शी तालुक्‍यात 95 ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेता, निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे असतानाही गावागावांत रणधुमाळीसाठी आटापिटा सुरू आहे. 

ग्रामपंचायत बिनविरोधासाठी गावकी, भावकी आणि पक्षीय राजकारण या गोष्टी अडसर ठरतात. परंतु, विकासाचा विचार करता तरुणांनी एकत्र येऊन निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा कणा मानली जाते. अलीकडे चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. शिवाय, इतर विकास योजनेंतर्गत लाखो रुपये येत असतात. त्यामुळे स्थानिक विकास योजनेत सरपंचपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्ष व पार्ट्यांमधील द्वेष भावनाही वाढत चालली आहे. त्यामागे निवडणुका हेच कारण असून, लोकप्रतिनिधींनी निवडणुका बिनविरोध करून लोकशाही मजबूत करावी, यासाठी याची सुरवात गावातून व्हायला पाहिजे, असा विचार आता ग्रामस्थांमधून पुढे येत आहे. 

गोळाबेरजेत लाखोंचा खर्च 
ग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळवण्यासाठी अनेकदा आटापिटा केला जातो. सदस्यांची गोळाबेरीज करताना लाखो रुपये खर्च होतो. ग्रामीण विकासाचे सर्वोच्च मानाचे पद आरक्षित असल्यास उपसरपंच गावाचा गाडा चालवताना दिसतात. अनेक ठिकाणी सरपंच सदस्यांना ठिश्वासात न घेता कामकाजाचा गावगाडा चालवतात. त्यामुळे गावाच्या एकीत बेकी नको, असे अनेकांना वाटते. गावातील निवडणुका विश्वासात घेऊन बिनविरोध होण्याची गरज असल्याचे मत सुजाण मतदारांतून व्यक्त होत आहे. 

गावोगावी ग्रामपंचायत निवडणूका लागल्या आहेत. गाव पातळीवर लहान - मोठ्या गोष्टीवरून राजकारण केले जाते. त्यामुळे बिनविरोध निवडणुका झाल्यास गावात एकी राहील. गोरगरिबांना त्रास होणार नाही. 
- कमलाकर क्षीरसागर, 
मुंगशी (वा), ता. बार्शी 

कोरोना रोगाच्या थैमानामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यात ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. कारोना महामारीत अनेकजन आर्थिक बेकार व कर्जबाजारी बनलेत. त्यास पर्याय म्हणून गावोगावच्या ग्रामपंचायती बिनविरोध व्हायला हव्यात. 
- सचिन गायकवाड, 
माजी बिनविरोध सरपंच, इर्लेवाडी, ता. बार्शी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT