Ganesh 
सोलापूर

गणेशोत्सवासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिले पोलिस आयुक्तांनी "हे' निर्देश

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी सार्वजनिक उत्सव मंडळांना केले आहे. गणेश मूर्ती खरेदीपासून ते विसर्जनापर्यंत गर्दी टाळणे, मिरवणूक न काढणे, प्रत्यक्षात दर्शनाऐवजी ऑनलाइन दर्शनाची सोय करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, मंडळांनी कोरोना जनजागृतीसह स्वच्छतेचे संदेश देण्यावर भर द्यावा, अशी आचारसंहिता पोलिसांनी घालून दिली आहे. 

शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत झाले, तरीही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. लॉकडाउनमुळे धार्मिक, सामाजिक व उद्योगांवर सरकारने निर्बंध घातले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वांत मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात मंडळांनी सर्व नियमांचे पालन करावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी करू नये, स्वत:बरोबरच कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, धर्मवीर संभाजीराजे तलावाशेजारी मूर्ती विसर्जनासाठी 50 हजार लिटर क्षमतेचे दोन हौद तयार केले जात आहेत. त्यासाठी 2017 मध्ये मंजुरी मिळाली होती. यंदा मूर्ती विसर्जनासाठी परवानगी नसली, तरीही आगामी काळात तलावाचे प्रदूषण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी तलाव उभारण्याचे काम सुरू आहे. 

गणेशोत्सव मंडळांना पोलिसांच्या सूचना... 

  • चौकात, रस्त्यांवर मंडप मारणे आणि मिरवणुकीस नाही परवानगी 
  • घरगुती गणेश मूर्ती दोन फुटांची तर सार्वजनिक मूर्ती असावी चार फुटांपर्यंत 
  • उत्सवासाठी मागील वर्षी ज्यांनी परवानगी काढली, त्यांना 2021 मध्ये मिळेल परवानगी 
  • बॅंड पथक, लेझीम, झांज पथक, ढोली - ताशासह वाद्य वाजविण्यावर निर्बंध 
  • होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावण्यास परवानगी मिळणार नाही 
  • गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करावे; सार्वजनिक ठिकाणी विसर्जनास परवानगी नसेल 

श्री गणेशाची पूजा 

  • आरती तथा पूजेसाठी किमान दहा व्यक्‍ती बंधनकारक 
  • सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्‍यकच 
  • गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह सदस्यांनी आरोग्य सेतू ऍप वापरावे 
  • सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांमार्फत करावी पूजा 
  • सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत लहान स्पीकर लावण्यास परवानगी 

याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिका यांच्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे सर्व गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असेल. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT