crop insurance  sakal
सोलापूर

तक्रारदार तुर उत्पादक शेतकरी अजूनही भरपाई पासून वंचित विमा कंपनीचे मात्र हात वर

नुकसानी पेक्षा विमा हप्ता भरलेल्या पेक्षाही कमी भरपाई देऊन

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतील नुकसान झालेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना तोकडी भरपाई देण्याचा प्रताप विमा कंपनी केला असताना अजुनही तालुक्यातील बहुसंख्य तक्रार करूनही शेतकरी भरपाई पासून वंचित ठेवले आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, तूर,मका या पिकाचा विमा भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे भरला होता गेल्या दोन वर्षापासून विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची कल्पना 72 तासाच्या देण्याच्या सुचना असल्याने तालुक्यातील दक्षिण भागातील बहुसंख्य गावात 3 डिसेंबर 2021 ला अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या तूर पिकाची तक्रार ऑनलाईन केली.

नुकसानीच्या ॲप मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लेखी तक्रार कृषी खात्यामार्फत विमा कंपनीकडे केली परंतु त्या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपया देखील भरपाई विमा कंपनीने दिली नाही शिवाय ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती त्यांना चारशे रुपयापासून साडेचार हजार रुपये पर्यतची तोकडी भरपाई जमा केली. नुकसानी पेक्षा विमा हप्ता भरलेल्या पेक्षाही कमी भरपाई देऊन विमा कंपनीने पुन्हा विमा भरू नये असा एक प्रकारे संकेत दिला. याबाबत केलेल्या तक्रारीच्या डाॅकेट आयडीवरून विमा पोर्टल च्या ॲप मध्ये चौकशी केली असता अजुनही पेंडिंग फोर सर्वे असा चुकीची माहिती दिली जात आहे यावरून विमा कंपनीच्या कारभाराचा नमुना शेतकर्‍यांसमोर आला आहे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी डॉकेट आयडी, विमा भरलेली पावती ची मागणी केली त्यामुळे मिळणारा विमा आणि सोलापूरला होणारा हेलपाटा यामुळे विमा न भरलेल्या बरा अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकरी झाली.त्यामुळे विमा कंपनीच्या मनमानी कारभाराबद्दल तालुक्यातून कोण विचारणार असा सवाल विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विचारला जात आहे.

2 डिसेंबर 2021 ला अवकाळीने झालेल्या तूर पिकाच्या नुकसानीची तक्रार तीन डिसेंबरला केली. लगतच्या शेतकऱ्याची भरपाई जमा झाली.मात्र माझी अद्याप जमा नाही.नुकसानीबाबत पी.एम.एफ.बी.वायच्या पोर्टल वर पाच महिन्यानंतर दि.28 एप्रिल 2022 रोजी अजूनही पेंडिंग फोर सर्वे स्टेटस, यावरून पीक नुकसान तक्रारीसाठी शेतकऱ्यांना 72 तासाचा नियम तर विमा कंपनीला नियम नाही अशी परिस्थिती एकंदरीत दिसून येते.याबाबत विचारायचे कोणाला ?

बाळू मोरे शेतकरी,भाळवणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT