family planning 
सोलापूर

"या' शासकीय रुग्णालयात केलेली स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया असफल ! संबंधितांवर कारवाईसाठी तक्रारदाराने घेतली आमदाराकडे धाव 

नितीन मगर

निमगाव (सोलापूर) : शासकीय रुग्णालयात स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करूनही असफल झाल्याची तक्रार माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदाराने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आरोग्यमंत्री, सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व माळशिरस पोलिस ठाणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

याबाबत श्री. करडे यांच्या म्हणण्यानुसार, की गारवाड (ता. माळशिरस) येथील नवनाथ करडे यांच्या पत्नीची प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पहिली शस्त्रक्रिया 11 ऑगस्ट 2010 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, माणकी येथे झाली. त्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्‍टरांच्या चुकीमुळे त्यांच्या पत्नीच्या पोटात गाठ आली. ती गाठ काढण्यासाठी पुन्हा एकदा शस्त्रक्रिया केली. त्यानंतर करडे यांना तीन अपत्ये झाली. त्यानंतर 5 ऑक्‍टोबर 2017) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरनगर (अकलूज) येथे शस्त्रक्रिया केली. त्यानंतरही त्यांच्या पत्नीला गर्भधारणा झाली आहे. त्यांनी याची तक्रार दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, माणकी येथील दोन डॉक्‍टर आले. त्यांनी करडे यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला. परंतु पहिल्या तीन शस्त्रक्रिया असफल झाल्यामुळे पत्नीचे काही बरेवाईट होईल या भीतिपोटी त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणात हलगर्जीपणा करून रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या डॉक्‍टरांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नवनाथ करडे यांनी आमदार सातपुते यांच्याकडे केली आहे. 

श्री. करडे म्हणाले, माझ्या पत्नीची शासकीय रुग्णालयात स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करूनही गर्भधारणा झाली आहे. याची तक्रार माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री, सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, माळशिरस पोलिस ठाणे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. संबंधितांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. 

आमदार सातपुते म्हणाले, शासकीय रुग्णालयात केलेली स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया असफल झाल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. यातील सर्व दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करेन. तक्रारकर्त्याला न्याय मिळेल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT