Complaint of non availability of ration cereals in Pandharpur 
सोलापूर

कोरोना : स्वस्त धान्यासाठी पंढरपुरात महिलांचा टाहो 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याने आज संत पेठ परिसरातील शेकडो महिलांनी टोहो फोडून आपली कैफीत स्थानिक पदाधिकारी आणि समाजिक कार्यकर्त्यासमोर मांडली. 
संत पेठ भागातील नागरिकांसाठी लक्ष्मीनगर (झोपडपट्टी) येथे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानातून या भागातील अनेक कुटुंबे शासकीय योजनेतून मिळणार्या धान्यापासून वंचित आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या भितीमुळे अनेक गरीब कुटुंबांच्या हातांना काम नसल्याने त्यांची कुचंबना सुरु आहे. किमान शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळावी अशी त्याची माफ अपेक्षा आहे. येथील सुमारे दोनशे हून अधिक कुटुंबे शासकीय धान्याच्या लाभा पासून वंचित आहेत. येथील रेशन कार्ड धारक महिलांनी आनलाईन नोंदनीसाठी अनेक वेळा आवश्‍यक ती कागद पत्रे दिली आहेत. तरी या कुटुंबांना धान्य मिळत नाही. अधिकार्यांकडे पाठपुरावा करुन ही दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा अध्यक्षा साधना राऊत आणि जिल्हा कार्याध्यक्षा कांचन खंडागळे यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली. यावेळी श्रीमती राऊत यांनी लाभार्थी महिलांची तक्रार तहसीलदार आणि प्रांताधिकार्याकडे केली आहे. येथील अनेक कुटुंबांना गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय धान्य मिळत नाही. रेशनदुकानदार ही त्यांना माहिती देत नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आम्हाला धान्य मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT