shrikant deshmukh bjp solapur district president resigns sakal
सोलापूर

भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाविरूध्द पिडितेची महिला आयोगात तक्रार

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पिडीत महिलेने देशमुखांविरूध्द महिला आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. त्यामुळे आता त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पिडीत महिलेने देशमुखांविरूध्द महिला आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. त्यामुळे आता त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

आपल्याला एक महिला हनी ट्रपमध्ये अडकवित असल्याची तक्रार श्रीकांत देशमुख यांनी मुंबईतील ओशिवरा पोलिसांत दिली होती. तोवर देशमुख हे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी कायम होते. पण, चार-पाच दिवसांनी पिडित महिलेने देशमुख यांच्यासोबतचा व्हिडिओ सोशल मिडियातून व्हायरला केला आणि सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे श्रीकांत देशमुख यांना तातडीने राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मी जिल्हाध्यक्ष पदावरून पक्षाला न्याय देऊ शकत नसल्याचे सांगत देशमुख यांनी राजीनाम्यातून ‘मी पुन्हा येईन’ म्हटले होते. पण, वास्तविक पाहता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या बाबतीतील प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडल्याची चर्चा आहे. दरम्यान, देशमुख यांनी आपल्यासोबत विवाह केल्याचेही पिडीत महिलेचे संभाषण सोशल मिडियावर व्हायरल झाले. आता देशमुख हा मोठ्या राजकीय पक्षाचा बलाढ्य नेता असल्याने आपण ऑनलाइन तक्रार करीत असल्याचे नमूद करीत तिने शनिवारी (ता. १६) महिला आयोगाला ई-मेला केला आहे.

प्रकरणाचा शेवट काय असेल

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. आता त्यांच्यात घडलेला प्रकार नेमका काय आहे, याची चौकशी महिला आयोगाच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा शेवट काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT