Railway
Railway esakal
सोलापूर

धावत्या रेल्वेत TC अथवा RPF कर्मचाऱ्यांकडे करता येणार तक्रार!

विजय थोरात

या सुविधेमुळे प्रवाशांना पोलीस स्टेशनला जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून, चोरट्यांचा वेगाने शोध घेता येणार आहे.

सोलापूर : प्रवाशांनो आता तुम्हाला धावती रेल्वे (Running Trains) थांबवण्याची किंवा तुमचा प्रवास (Travel) अर्धवट सोडून गुन्हा (Crime) नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनला (Police station) जाण्याची गरज नाही. कारण तुमच्या प्रवासादरम्यान असलेल्या तिकीट तपासणीस (Ticket check) किंवा आरपीएफ (RPF) जवानांकडे असलेला गुन्हा नोंद करण्याचा फॉर्म मागून त्यांच्याकडे गुन्हा नोंद (Crime record) करता येणार असल्याची माहिती रेल्वेच्या विश्‍वसनीय सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

या सुविधेमुळे प्रवाशांना पोलीस स्टेशनला जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून, चोरट्यांचा वेगाने शोध घेता येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा (Railway Security Force) बलातर्फे रेल्वे गाड्यांमध्ये आणि स्थानकावर सुरक्षा व्यवस्था (Security arrangements)
असली तरी अनेक वेळा मोबाईल (Mobile), सोनसाखळी (Gold chain), बॅग (Bag) आदी चोरीच्या घटना घडत असतात. गेल्या काही महिन्यात धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलातर्फे प्रवाशांची कोणतीही वस्तू गाडीत चोरीला गेल्यास गाडीमध्येच तक्रार (Complaint) देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिकिट तपासनीस, रेल्वे पोलीस किंवा गार्ड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल (Filed a crime) करता येणार आहे.

संबंधित तिकीट तपासणीस (Ticket check) किंवा रेल्वे पोलीस (Railway Police) त्या गुन्ह्याची प्रत पुढील स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहेत. यामध्ये रेल्वे सुरक्षा बलाकडून हा गुन्हा रेल्वे लोहमार्ग पोलीस (Railway Police) अर्थात जीआरपीकडून संबंधित गुन्ह्यांचा तपास (Crime Investigation) करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचबरोबर डायल 139 रेल्वे सुरक्षा अपघात माहिती तक्रार वैद्यकीय आणीबाणी चालू स्थिती इ. कॅटरिंग तक्रार दक्षता आणि कोचची भ्रष्टाचार प्रतिबंधक स्वच्छता रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर संपर्क साधू शकता असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची साहित्य चोरीला गेल्यास रेल्वेखाली न उतरता तिकीट तपासणी अथवा रेल्वे पोलीस यांच्याकडून फॉर्म घेऊन तक्रार नोंदविता येणार आहे. त्यामुळे तपासात गती मिळणार आहे. त्याचबरोबर रेल्वे हेल्पलाइन 139 नंबर देखील तक्रार नोंद करता येणार आहे.

- श्रेयस चिंचवाडे, आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

SCROLL FOR NEXT