गोकूळ शुगर Canva
सोलापूर

आमच्या ओरडण्याला शून्यच किंमत! "गोकूळ'ला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचा टाहो

आमच्या ओरडण्याला शून्यच किंमत! "गोकूळ'ला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचा टाहो

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापुरात येऊन कारखान्याच्या साहेबांची भेट घेतली तर साहेब गोड गोड बोलतात. चहा पाजतात, उद्याच तुमच्या बॅंक खात्यावर पैसे जमा करतो असं सांगतात. पण पुढे काहीच घडत नाही.

सोलापूर : कारखान्यावर गेलो तर वॉचमन म्हणतोय, "साहेब नाहीत आले जावा तुम्ही'. सोलापुरात येऊन कारखान्याच्या साहेबांची भेट घेतली तर साहेब गोड गोड बोलतात. चहा पाजतात, उद्याच तुमच्या बॅंक खात्यावर पैसे जमा करतो असं सांगतात. पण पुढे काहीच घडत नाही. आमच्या ओरडण्याला शून्यच किंमत असल्याची व्यथा बोरामणीतील ऊस उत्पादक डॉ. विजय चव्हाण यांनी मांडली आहे. (Complaints of many farmers about Gokul Sugars factory-ssd73)

डॉ. चव्हाण हे एक प्रातिनिधिक स्वरूपातील नाव आहे. धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकूळ शुगर्सला (Gokul Sugars) ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. तळहाताच्या फोडासारखा जपलेला ऊस या कारखान्याला घातला. आपल्या घामाचा मोबदला मिळवण्यासाठी या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखे कारखानदारापुढे हात पसरविण्याची बिकट वेळ आली आहे. कोरोना महामारी, दवाखान्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न अशा एक ना अनेक कारणांसाठी उसाचे पैसे कामाला येतील, या आशेने गोकूळ शुगरला ऊस घातलेले शेतकरी रोज कारखान्याचे आणि सोलापुरात असलेल्या कारखान्याच्या ऑफिसचे उंबरठे झिजवत आहेत.

काही शेतकऱ्यांची जवळपास दोन वर्षांपासूनची बिले मिळालेली नाहीत. आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील म्हणून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, तुळजापूर तालुक्‍यातील शेतकरी रोज न चुकता कारखान्याच्या ऑफिससमोर येऊन बसतात. हक्काचे पैसे तर मिळतच नाहीत; परंतु कारखान्याचे एम. डी., कृषी अधिकारी, चीफ अकाउंटंट यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे वाईट बोलणे खाण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आली असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

डॉक्‍टर थकले, सामान्य शेतकऱ्यांचे कुठे लागावे...

तब्बल सात महिन्यांपूर्वी गाळप झालेल्या उसाचा एकही रुपया मिळालेला नाही. ही रक्कम मिळवण्यासाठी डॉ. चव्हाण यांनी सर्व पद्धतीचे प्रयत्न केले तरीही त्यांना यश आलेले नाही. ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवरच आहे, जे शेतकरी अल्पशिक्षित आहेत, त्यांना त्यांचे पैसे मिळवण्यासाठी अनेक यातना सोसाव्या लागत आहेत. ज्यांचा ऊस गाळप झाला त्यांना पैसे नाहीत आणि येत्या गळीत हंगामासाठी वाहनांचे व टोळ्यांचे करार करण्यासाठी कारखान्याकडे पैसे आहेत का? असा सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

उपोषणाची धमकी अन्‌ हजाराचा ऍडव्हान्स

ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी कारखान्याच्या गेटवर अथवा सोलापुरात उपोषण करण्याचा निर्णय घेतला, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी इतर माध्यमातून प्रयत्न केले, त्या शेतकऱ्यांना प्रतिटन एक हजार रुपये याप्रमाणे ऍडव्हान्स देऊन त्यांची बोळवण कारखान्याने केली असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT