2Copy_20of_20coronavirus_test_20positive_26.jpg 
सोलापूर

शहराची पुन्हा वाढली चिंता ! आज 'या' नगरात आढळले 72 पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : दहा दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर शहरातील कमी झालेली रुग्णसंख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. शहरात सुमारे तीनशे शिक्षक कोविडचा सर्व्हे करत असून महापालिकेचेही शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोना ड्यूटी देण्यात आली आहे. नागरी आरोग्य केंद्रे व लहान-मोठ्या रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या को-मॉर्बिड रुग्णांची टेस्ट करणे बंधनकारक केल्याचा आदेश महापालिका आयुक्‍तांनी काढला. या पार्श्‍वभूमीवर शहरात दररोज दिड ते दोन हजार संशयितांची टेस्ट होणे अपेक्षित आहे. मात्र, दररोज चारशे ते साडेचारशे संशयितांचीच टेस्ट केली जात आहे. बुधवारी (ता. 9) 457 संशयितांमध्ये 72 जण पॉझिटिव्ह आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील कोरोना टेस्टिंगची संख्या झाली कमी 
  • आज (बुधवारी) 457 संशयितांपैकी 72 कोरोना पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत शहरातील 69 हजार 903 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील रुग्णसंख्या आता सात हजार 217 झाली; पाच हजार 962 रुग्ण झाले बरे 
  • आतापर्यंत शहरातील 435 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 

बाईज हॉस्टेल, वसुंधरा अपार्टमेंट, आसरा सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर, श्रीशैल मल्लिकार्जुन नगर, मोहोळ अपार्टमेंट (होटगी रोड), मुस्लिम पाच्छा पेठ, बुधवार पेठ, मुरारजी पेठ, वसंत विहार, गणेश नगर, अरुणा हौसिंग सोसायटी (बाळे), लोकमंगल विहार, कलावती नगर (एमआयडीसी), राघवेंद्र नगर (सैफूल), मेहता सोसायटी, भाग्यश्री नगर (नवीन आरटीओ कार्यालयाजवळ), मिलिंद नगर, शिवाजी सोसायटी, एसटी कॉलनी, द्वारका नगर, समर्थ सोसायटी, विनय सोसायटी (विजयपूर रोड), विश्राम हौसिंग सोसायटी, समर्थ नगर, दमाणी नगर, रेल्वे लाईन, कंदी नगर (दहिटणे), गजनी प्लाझा, रेणुका नगर (जुळे सोलापूर), नरसिंग गिरजी चाळ, मोदी पोलिस स्टेशनजवळ, स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), मंजुनाथ नगर, रामवाडी पोलिस ठाण्याजवळ, संजय नगर, भूषण नगर, जोडभावी पेठ, न्यू सुनिल नगर (अक्‍कलकोट रोड), शेळगी, देशमुख-पाटील वस्ती (दमाणी नगर), नाथ रेसिडेन्सी (रुपाभवानी रोड), गुरुनानक नगर, अंत्रोळीकर नगर भाग-दोन, नाथ रेसिडेन्सी (मंत्रि चंडक), मार्कंडेय सोसायटी (पाच्छा पेठ) आणि निलम नगर (एमआयडीसी) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. 


'येथील' रुग्णांचा झाला मृत्यू 
बुधवारी (ता. 9) विजयपूर रोडवरील सिटीझन पार्क येथील 62 वर्षीय महिला, स्वागत नगरातील 30 वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर बसवेश्‍वर नगरातील (देगाव) 70 वर्षीय पुरुष आणि सात रस्ता परिसरातील नाथ प्लाझा येथील 72 वर्षीय पुरुषाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यू झालेला 30 वर्षीय तरुण श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शनिवारी (ता. 5) उपचारासाठी दाखल झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT