सोलापूर

सोलापुरात दुपारी "निगेटीव्ह' ; रात्री "पॉझिटीव्ह' 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : क्वारंटाईन केलेल्या दोन तरुणांना काल सोमवारी दुपारी "निगेटिव्ह' असल्याचे सांगत त्यांना सोडण्यात आले, मात्र रात्री प्रसिद्ध झालेल्या यादीत या दोन्ही तरुणांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे जाहीर झाल्याने त्या दोघांना पुन्हा उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तत्पूर्वी या दोघांनीही आपल्या अनुभवाची माहिती व्हिडीअोच्या माध्यमातून नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्याकडे पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात "निगेटीव्ह' आणि "पॉझिटीव्ह'वरून बराच गोंधळ सुरु आहे. त्यातच बाधीत रुग्णाच्या वास्तव्याच्या परिसराचे नाव प्रसिद्ध करण्यातही चुका होत असल्याने गोंधळ वाढू लागला आहे. 

रविवार पेठ परिसरात वास्तव्यास असणाऱ्या दोन युवकांना पोलिस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. काल या दोघांनाही "निगेटीव्ह' असल्याचा दाखला देत, त्यांना होम क्वारंटाईन करीत, तसा शिक्का त्यांच्या हातावर मारला व त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे ते दोघेही आनंदाने घरी परतले. मात्र रात्री जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत या दोघांचीही नावे "पॉझिटीव्ह' रुग्णांच्या अहवालात आल्याने त्यांना पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी याच परिसरातील महिला रुग्णाबाबत झाला होता. या महिलेचा अहवाल निगेटीव्ह असल्याचे सांगून तिला घरी सोडण्यात आले. त्यानंतर ही महिला कुटुंबियांमध्ये रमली, गल्ली बोळातही अनेकांशी तिने संवाद साधला. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगत तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे प्रसिद्ध होणाऱ्या अहवालावरून गोंधळ निर्माण होऊ लागला आहे. सोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. मात्र अशा पद्धतीचे अहवाल येऊ लागल्याने गोंधळात भर पडू लागली आहे. या संदर्भात शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

अहवालाचा गोंधळ सुरु असतानाच बाधित रुग्णाच्या परिसराचाही उल्लेख अनेकवेळा चुकीचा होऊ लागला आहे. मध्यंतरी खुद्द जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना "शांतीनगर' नव्हे "शास्त्रीनगर' असा खुलासा करावा लागला होता. काल बुधवार पेठ परिसरासंदर्भातही असाच गोंधळ झाला. बाधित रुग्ण हे बुधवार पेठ मिलिंदनगर भागातील सात पुरुष व पाच महिला असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात हे रुग्ण न्यू बुधवार पेठ परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. एकुणच कोरोना रुग्णांचे अहवाल आणि त्यांच्या वास्तव्याच्या परिसराचा चुकीचा उल्लेख यावरून मोठा गोंधळ होऊ लागला आहे. 

बाधित रुग्णांचे अहवाल अचूक असावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय रग्णालयातील संबंधित विभागाशी समन्वय ठेवावा. त्यामुळे बाधित रुग्णांमध्ये गोंधळ होणार नाही, तसेच चुकीचा अहवाल आला तर त्याचे परिणाम त्या परिसरातील नागरिकांना भोगावे लागणार नाहीत. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT