Congress  esakal
सोलापूर

Congress : महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये; महिला शहराध्यक्षही बदलणार

महापालिका निवडणुकीपूर्वी नव्या चेहऱ्यांना संधी; अल्पसंख्याक अध्यक्षही नवीनच

सकाळ डिजिटल टीम

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला शह देण्याची तयारी शहर काँग्रेसने सुरू केली आहे. चेतन नरोटे यांना शहराध्यक्ष केल्यानंतर आता महिला व अल्पसंख्याक शहराध्यक्ष बदलाचे नियोजन पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे. फेब्रुवारीत दोन्ही पदांवर नवीन चेहरे दिसतील, असे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसमधील माजी महापौर नलिनी चंदेले, ॲड. यू. एन. बेरिया, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षांतर केले. आता महापालिकेत सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला विशेषत: काँग्रेसला शिंदे गटाशी देखील सामना करावा लागणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करताना तरुण व महिलांची फळी पक्षासोबत उभी करण्याचे नियोजन शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले आहे.

दरम्यान, महिला शहराध्यक्षा म्हणून हेमा चिंचोळकर यांनी अनेक वर्षे काम केले आहे. परंतु, पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने महिलांची संख्या अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. अनेक जुन्या पदाधिकारी, माजी नगरसेविका पक्षापासून दुरावल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी त्या सर्वांना एकत्रित आणले जाणार आहे. दुसरीकडे, अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी तौफिक हत्तुरे यांना पक्षाने अनेक वर्षे संधी दिली आहे. आता त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील तरुण चेहऱ्याला संधी मिळणार आहे.

शहराध्यक्षपदी ‘यांना’ मिळणार संधी

महिला शहराध्यक्ष पदासाठी पद्मशाली समाजातील भारती इप्पलपल्ली, मुस्लिम समाजातील फिरदोस पटेल व मागासवर्गीयातून प्रमिला तुपलोंढे यांची नावे आघाडीवर आहेत. पक्षाकडून लिंगायत समाजातील महिलेचाही शोध सुरू आहे. दुसरीकडे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष पदासाठी मुस्लिम समाजातील जुबेर कुरेशी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनाच संधी मिळेल, असे पक्षातील वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा करूनच हा बदल होईल, असेही त्या नेत्याने यावेळी सांगितले.

महापालिकेत महाविकास आघाडीच

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला स्वतंत्रपणे लढणे परवडणारे नाही. तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे महाविकास आघाडी करून महापालिका निवडणूक लढल्यास निश्चितपणे महापालिकेवर सत्ता मिळू शकते. तत्पूर्वी, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, संतोष पवार यांच्यासह सर्व नेत्यांसोबत बैठक होईल. त्यातून जागावाटप निश्चित होऊन जागांचा तिढा सोडविला जाईल, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT