Congres Meeting 
सोलापूर

कृषी कायद्याविरोधात अक्कलकोटमध्ये सोमवारी कॉंग्रेसचा ट्रॅक्‍टर, बैलगाडी मोर्चा : सिद्धाराम म्हेत्रे 

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (2 नोव्हेंबर) दुपारी एक वाजता भव्य बैलगाडी व ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. 

अक्कलकोट येथे कॉंग्रेस भवनमध्ये बैलगाडी व ट्रॅक्‍टर मोर्चाच्या नियोजनासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे बोलत होते. या वेळी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, विलासराव गव्हाणे, मल्लिकार्जुन काटगाव, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भीमा कापसे, युवक अध्यक्ष बाबा पाटील, मुबारक कोरबू, महिला आघाडीच्या मंगल पाटील, राजा जाधव, सातलिंग शटगार, धानेश अचलेर, विश्वनाथ हडलगी, वागदरीचे सुधीर सोनकवडे, सायबू गायकवाड, माजी नगरसेवक रामचंद्र समाने, शिवशरण इचगे, शशी बकरे, पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड, उपसभापती प्रकाश हिप्परगी, वकील बागवान, शिव स्वामी, राजकुमार लकाबशेट्टी, जहॉंगीर शेख, काशिनाथ बणजगोळ, सिद्धाराम भंडारकवठे, शाकीर पटेल, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते. 

हा मोर्चा फत्तेसिंह क्रीडांगणापासून प्रारंभ होणार असून एवन चौक, बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड मार्गे फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय मार्गे कॉंग्रेस भवन येथे समारोप होणार आहे. जुन्या तहसील कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या बैलगाडी व ट्रॅक्‍टर मोर्चात सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. म्हेत्रे यांनी केले. 

या वेळी जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी म्हणाले, की मैंदर्गी, सलगर भागात सह्यांच्या मोहिमेसंदर्भात सभा घेतलेल्या असून कॉंग्रेस पक्षातर्फे एक लाख लोकांच्या सह्या केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात घेण्यात येणार आहे. दिलीप बिराजदार यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. मुबारक कोरबू यांनी आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Flight Ticket Price: मुंबईला जाण्यासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी मोजले १८ हजार; उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग केल्याने जादा दर; विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

Kolhapur Gokul : भैय्या, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही; सतेज पाटील : सरकार म्हणंल तसंच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घडतंय 

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

SCROLL FOR NEXT