नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : आपल्या आसपास आज अनेक कुटुंबे आहेत जी दररोज कष्ठ केल्याशिवाय जगू शकत नाहीत, ही गरज ओळखून नातेपुते येथील अविनाश दोशी व पंचायत समिती सदस्य माऊली पाटील यांनी अहिंसा सेवा समिती व माऊली पाटील मित्रपरिवार यांच्यावतीने 6 एप्रिलपासून मागणीप्रमाणे घरपोच जेवण देण्याचे सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाला त्यांच्या मित्र परिवारांनी, गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे. दररोज एक जण या जेवणाचा भार उचलीत आहे. सरासरी 1350 जेवणाचे डबे कार्यकर्ते पोहोच करत आहेत. 25 एप्रिल अखेर तब्बल 20 हजार 201 जणांना जेवण पोहच केले आहे. तर 3 मे अखेर 31 हजार लोकांना जेवणाचे डबे पोहच होतील, असे आजचे चित्र आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन आहे. दररोज हातावर पोट असणाऱ्या लाखो कुटुंबियांचा रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी अनेक दानशूरांनी अनेक सामाजिक संघटनांनी, राजकीय नेत्यांनी कुटुंबियांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पॅकिंग करून घरपोच केलेल्या आहेत.
या महायज्ञासाठी महावीर दोशी, महेश दावडा, संजय दोशी, डॉ. दीपक गांधी, दोशी मेडिकल, अतुल पाटील, साजीद तांबोळी, पुष्कर ज्वेलर्स, रविराज ज्वेलर्स, तेजस काळे, पांढरे इलेक्ट्रिकल, बाबुराव जमाले, प्रशांत सरूडकर, तुकाराम ठोंबरे, श्री. नरळे, सचिन पांढरे, अलंकार देशपांडे, रामदेव स्टील, डॉ. वर्धमान दोशी, भारत भूषण चंकेश्वरा, आप्पासाहेब रुपनवर, धुळदेव व चंद्रप्रभू पतसंस्था, सराफ असोसिएशन, विनोद मेडिकल, ऋषभ दोशी आदींनी योगदान दिले आहे.
स्वयंपाकाचे व जेवण पोहोच करण्याचे महत्त्वाचे काम माऊली शिंदे, राहुल पांढरे, मुदस्सर शेख, महेंद्र पिसाळ, तेजस काळे, सचिन बोडरे, देवा चव्हाण, विशाल चव्हाण, राहुल बोराटे, शेखर पिसे, राहुल रणदिवे, अमोल भोसले, कृष्णा थोरात, रोहित नवगिरे, रुपेश भरते, परेश कवितके, साजिद तांबोळी, महेंद्र दोशी, महेंद्र दोशी, गोमटेश दोशी, बाबा काळे, बबलू वाघमारे हे मोलाचे काम करीत आहेत. या उपक्रमास प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील व इतर मान्यवरांनी भेटी देऊन कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.