Dry Fruits Sakal
सोलापूर

दिलासादायक! ऐन हिवाळ्यात सुका मेवा झाला स्वस्त

दिलासादायक! ऐन हिवाळ्यात सुका मेवा झाला स्वस्त; बदाम व काजूच्या दरात घसरण

प्रकाश सनपूरकर

हिवाळा सुरू होत असताना सुका मेव्याची मागणी वाढली आहे. मात्र, सुका मेव्याचे भाव बऱ्यापैकी उतरले आहेत.

सोलापूर : हिवाळा (Winter) सुरू होत असताना सुका मेव्याची (Dry Friuts) मागणी वाढली आहे. मात्र, सुका मेव्याचे भाव बऱ्यापैकी उतरले आहेत. या भाव घसरणीचा फायदा ग्राहकांना हिवाळ्यासाठी चांगलाच होणार आहे. हिवाळ्यात सुका मेव्याची मागणी सर्वाधिक असते. सुका मेवा बाजारासाठी हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम मानला जातो. दोन वर्षानंतर बाजारपेठ उघडल्यानंतर आता अचानक सुका मेव्याचे भाव बऱ्यापैकी कमी झाले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून काजूचे भाव वधारलेले होते. काजूचे भाव 900 रुपयांपेक्षा अधिक होते. यावर्षी मात्र, काजूच्या भावात अचानक घट झाली आहे. काजूचे भाव चक्क 200 ते 250 रुपयांनी घटले आहेत. बाजारात पुरेशी आवक असल्याने व इतर कारणाने काजूचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. काजूच्या पाठोपाठ बदामाचे भाव देखील उतरले आहेत. बदामाचे पूर्वीचे भाव 1 हजार रुपयापेक्षा अधिक होते. हे भाव आता अडीचशे रुपयांनी घटले आहेत.

बेदाण्याचे भाव 200 ते 251 रुपये किलोपर्यंत आहेत. त्यामध्ये देखील फार मोठी वाढ नाही. फक्त खोबऱ्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर खारकेचे भाव स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल नाही. खजुराचे भाव 20 रुपयांनी वाढले आहेत.

सुका मेव्याचे प्रतिकिलो बाजारभाव

  • काजूचे दर 1000 रुपयावरून 750 रुपयांवर

  • बेदाण्याचे भाव 250 रुपये

  • बदामाचे भाव 1000 रुपयांवरून 750 रुपयांवर

  • खारीकचे भाव 150 ते 250 रुपये किलोवर स्थिर

  • खजूरच्या भावात प्रतिकिलो 20 रुपयांची वाढ

हिवाळ्यात सुका मेव्याची मागणी वाढलेली असते. तरीही भाव मात्र कमी झाले आहेत. बदाम व काजू हे मागील काही वर्षात जादा दराने विकले गेले असताना यावेळी त्यांच्या भावात मात्र घट झाली आहे.

- प्रवीण ओसवाल, सुका मेवा व मसाले व्यापारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT