The container fires on the way 
सोलापूर

भर रस्त्यात धावत्या कंटनेरने घेतला पेट 

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ (सोलापूर) : विजयपूर महामार्गावर कामती ते कुरुल रस्त्यावर विजयपूरकडे प्रवासी बॅगा घेऊन जाणाऱ्या कंटेनरला शनिवारी (ता. 22) दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात सर्व बॅगा जळून खाक झाल्या आहेत. कंटेनरला आग लागल्याची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी तातडीने सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यात जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. 
नाशिक येथून चेन्नईकडे निघालेला ट्रान्स्पोर्ट कार्गो टेलर कंटेनर प्रवासी व सुटकेस बॅगा घेऊन निघाला होता. मोहोळ- विजयपूर मार्गावर कुरूल हद्दीत कंटेनरला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणली. दरम्यान, कंटेनर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. याच वेळी पोलिसांनी सोलापूर महापालिकेच्या अग्निशमनदलाच्या गाडीला पाचारण केले. पाण्याचा जास्त मारा करत आग आटोक्‍यात आणली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT