Robinhood Army
Robinhood Army Canva
सोलापूर

वर्षभर रुग्णोपचार अन्‌ गरजूंना अन्नदान ! "रॉबिनहूड आर्मी'ची कोरोना काळातसुद्धा निरंतर सेवा

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट (Akkalkot) शहरात वर्षातील 365 दिवस न थकता व न कंटाळता जे अन्नदान करणार आहेत त्यांचा शोध घेऊन ज्यांना गरज आहे त्यांचाही योग्य शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अन्नदान (Food donation) व इतर गरज असलेली अत्यावश्‍यक सेवा पुरविण्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून "रॉबिनहूड आर्मी'चे (Robinhood Army) नाव घेतले जाते. थकल्या- भागल्या व्यक्तीला पाणी पाजणे आणि उपाशीपोटी असलेल्यास अन्नाचा घास देणे हेच खरे जीवनदान म्हटले जाते. नेमका हाच उद्देश "सर्व्ह द हंग्री सिटिजन' (Serve the Hungry Citizen) या ब्रीदवाक्‍यासह येथील रॉबिनहूड आर्मीचे सदस्य कार्य करीत आहेत. (Continuous food donation service during the Corona period from the Robinhood Army at Akkalkot)

ज्यांच्याकडे अन्न शिल्लक राहिले आहे, त्यांच्याकडून ते संकलित करून मंदिर परिसर व बसस्थानकावरील भुकेल्या अवस्थेत असलेल्या प्रवाशांसह ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांसमवेत आलेल्या नातेवाइकांपर्यंत पोचवण्याचे काम निरलस सेवाभावाने या मंडळींकडून केले जात आहे. रॉबिनहूड आर्मीत सेवा देणाऱ्या कित्येक तरुणांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेमच आहे, तरीही आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांबद्दल तळमळ ही मात्र निश्‍चित वाखाणण्याजोगी आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी मैत्री दिनाचे औचित्य साधून 5 ऑगस्ट 2018 पासून सुरू झालेल्या या आर्मीत देविदास गवंडी, रशीद खिस्तके, योगेश महिंद्रकर, आशिष हुबे, अनंत क्षीरसागर, सरफराज कमानगर, श्रीधर गुरव, सोहेल शेख, अप्पा गवळी, अरबाज चाऊस, आकाश शिंदे, बाबूशा भालके, शोएब दारूवाले, सलमान पिरजादे, विशाल तडकलकर, श्रीशैल पाटील, समर्थ गोरे, छोटू फडतरे, मंजुनाथ स्वामी, सैपन तांबोळी, शुभम गवंडी, शशिकांत महाजन, अविनाश क्षीरसागर, कृष्णा गवळी आदी सदस्य वर्षभर स्वतःची महत्त्वाची कामे बाजूला ठेवून, स्वतःचे पेट्रोल गाडीत टाकून हे अन्नदानाचे काम करीत असतात. या सर्वांची ही सेवा कौतुकास्पद आहे.

अक्कलकोटमध्ये विविध सण-समारंभांतून वा विवाह सोहळा किंवा विविध धार्मिक कार्यक्रमांतून पाहुणे, भाविक वा अभ्यागतांसाठी चविष्ट भोजनाची मेजवानी अनेकजण आयोजित करतात. पण अपेक्षेपेक्षा कमी मंडळी आली तर अन्न खूप उरते. ते फेकून देणेही चांगले नसल्याने रॉबिनहूडच्या सदस्यांना दूरध्वनी केला जातो. ही मंडळी लगेच दाखल होतात. शिल्लक असलेले अन्न आधी सदस्यांपैकी कोणीतरी खाऊन पाहतो. त्याचा दर्जा चांगला असेल तर लगेच पॅकबंद करून मंदिर व दर्गा परिसर, बसस्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरात वेगवेगळी पथके रवाना होतात. अशा स्थितीत भूकेच्या वेळी मिळालेले अन्न अमृतासमान असल्याने पोट भरल्यावर तृप्तीचा ढेकर देत "रॉबिनहूडच्या सदस्यांचे आवर्जून कौतुक केले जाते व या अन्नसेवेला आवश्‍यक मदतही करण्याची ग्वाही दिली जाते. या अन्न वाटपानंतर लगेच अन्नाच्या खरकटे, कागदी डिश गोळा करून त्यांची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छही केला जातो. असे करीत वर्षभर या कोरोनाच्या लॉकडाउन काळाशी दोन हात करीत जवळपास 45 हजारांपेक्षा जास्त गरजूंना अन्नदान सेवा पोच केली आहे.

रॉबिनहूड आर्मी अन्नदानाशिवाय पूरग्रस्तांना मदत, रुग्णसेवा, शालेय विद्यार्थ्यांना मदत तसेच मूकबधिर विद्यार्थ्यांत रक्षाबंधन तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यांच्या या कामात रॉबिनहूड आर्मी, सोलापूरचे प्रमुख प्रा. हिंदुराव गोरे व प्रा. अनिकेत चनशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभते. अक्कलकोटमधील सर्व दानशूर व्यक्ती, अविराज सिद्धे, सुरेश कवटगी, भूषण शहा, हॉटेल बालाजी, बालाजी किराणा, विपुल दोशी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभते. याशिवाय आजपर्यंत या समाजोपयोगी कामामुळे या आर्मीस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्याकडून स्वामी सेवक, स्नेहलोक फाउंडेशन, पिरजादे कन्स्ट्रक्‍शन, कारंजा चौक नवरात्र मंडळ यांच्याकडून विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT