sand 
सोलापूर

गणेशगाव येथील वाळू गटाचे सात लाख रुपये ठेकेदाराला मिळणार परत 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने 2012-13 मध्ये राबविण्यात आलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेत माळशिरस तालुक्‍यातील गणेशगाव येथील वाळू गटाचा लिलाव महेश इंगळे यांच्या लक्ष्मी इंडस्ट्रीजला मिळाला होता. त्यासाठी त्यांनी नऊ लाख 97 हजार पाचशे रुपयांना सर्वोच्च बोली लावली होती. या गटाचा ताबा लक्ष्मी इंडस्ट्रीजला न मिळाल्याने त्यांना येथून वाळू उत्खनन करता आले नाही. त्यामुळे लिलावातील काही रक्कम ठेकेदाराला परत देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने घेतला आहे. याबाबतचा आदेश आज शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. 

बोलीची रक्कम लक्ष्मी इंडस्ट्रीजने जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी जमा केली होती. त्यानंतर या वाळू लिलावा प्रकरणी लक्ष्मण लोखंडे यांनी माळशिरस येथील न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्यामध्ये वाळू गटाचा ताबा देण्यास स्टेटस को चा आदेश माळशिरस न्यायालयाने दिला होता. त्यामुळे या वाळू गटाचा ताबा लक्ष्मी इंडस्ट्रीजला मिळाला नव्हता. ताबा न मिळाल्यामुळे लक्ष्मी इंडस्ट्रीजला या वाळू गटातून वाळू उत्खनन करता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाला गती प्रवास जलद; ३२ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीवर बंदी? श्रीलंकन ​​खेळाडूला ढकल्यामुळे अडचण, नियम काय सांगतो? समोर आली मोठी माहिती

Ahilyanagar: पहिल्याच दिवशी शाळा बंद, ७ वर्गांना फक्त ३ शिक्षक; पालक संतप्त

Solapur: गडकरींची संकल्पना, ६०-७० किमी रस्त्याचं काम ९ वर्षांपासून सुरू; तांदूळवाडी अपघात प्रकरणी ठेकेदार कंपनीच्या प्रमुखावर गुन्हा

Latest Marathi News Live Update : नागपुरात कोकरोच जनता पार्टीचे आज आंदोलन

SCROLL FOR NEXT