Kartiki Ekadashi Kartiki Mahapuja Ajit Pawar Devendra Fadnavis esakal
सोलापूर

Kartiki Ekadashi : कार्तिकी महापूजेचा पेच आज सुटण्याची शक्यता, कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा?

महापूजेवरून मराठा गटांत हमरीतुमरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेस विरोध अन्‌ समर्थनही

अंकिता खाणे (Ankita Khane)

कार्तिकीच्या शासकीय महापूजेवरून पंढरपुरातील मराठा समाजामध्ये मात्र दुफळी निर्माण झाली आहे. याच कारणावरून काल (सोमवारी ता. २०) दोन गट आमनेसामने आले. एका गटाने विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी केली तर दुसऱ्या गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला आहे. याच मुद्दावरुन दोन गटामध्ये हमरीतुमरी देखील झाली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकीच्या शासकीय महापूजेला विरोध केला होता. त्यावेळी सकल मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी भोसले यांच्या भूमिकेला समर्थन दिले होते. शेवटपर्यंत सकल मराठा समाज आपल्या भूमिकेवर ठाम होता.

दरम्यान, रविवारी नागेश भोसले व त्यांच्या सहकार्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकीच्या शासकीय महापूजेला सकल मराठा समाजाचा विरोध नसल्याचे जाहीर केले. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भोसले यांच्या भूमिकेला विरोध करत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध असल्याचे जाहीर केले.

दोन वेगवेगळ्या भूमिकेमुळे मराठा समाजामध्ये फूट पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रविवारी या विषयावर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मराठा समाजाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महापूजेवरुन वाद झाला. वादाचे रूपांतर हमरीतुमरीमध्ये झाले. वैयक्तिक हेव्यादाव्यापर्यंत प्रकरण गेले.

आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

कार्तिकी वारीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार या दोघांपैकी एकजण येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने व पोलिसांनी तशी तयारी केली आहे. मंगळवारी (ता. २१) रात्री उशिरापर्यंत महापूजेसाठी कोण येणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोळी समाजाचाही विरोध

महापूजेवरुन मराठा समाजामध्ये वाद निर्माण झाले असतानाच कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला आहे. कोळी समाजाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कोळी समाजाला सरकारने महादेव कोळी जातीचे दाखले देऊनच पंढरपुरात कार्तिकीच्या महापूजेसाठी यावे अन्यथा आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकीची महापूजा होवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. मराठा समाजानंतर कोळी समाज ही आक्रमक झाला आहे. त्यामुळे महापूजेचा वाद आणखीच वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT