Corona affected employees of Pandharpur Municipal Council will get Rs 1 lakh for treatment 
सोलापूर

पंढरपूर नगरपरिषदेच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी मिळणार एक लाख रुपये 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराच्या खर्चासाठी एक लाख रुपये देण्याचा निर्णय नगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. 
पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे यांनी नगरपरिषदेचे संवर्ग, आरोग्य कर्मचारी, नगरपरिषद रुग्णालयातील कर्मचारी, सर्व लिपीक शिपाई, सर्व विभाग प्रमुख गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. यामध्ये काम करत असताना चार कर्मचारी पॉझिटिव्ह झाले होते व भविष्यात सुद्धा कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याची शक्‍यता आहे. शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना विमा देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नगरपरिषदने कर्मचाऱ्यांचा कोरोना कवच हा विमा उतरावा किंवा त्यांना उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च देण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष सौ. भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सर्व स्थायी समिती सदस्य यांना केली होती. यास अनुसरून मुख्याधिकारी यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर शिफारशीसह ठेवला. 
आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्चासाठी एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेस नगराध्यक्षा सौ. भोसले, माजी नगराध्यक्ष व स्थायी समिती सदस्य दगडू धोत्रे, वामनराव बंदपट्टे, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, रेहाना इब्राहीम बोहरी, रेणुका धर्मराज घोडके यांनी एकमताने मंजुरी दिली. या निर्णयामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT