2Corona_20Sakal_20times_4.jpg 
सोलापूर

शहरात पुन्हा वाढू लागला कोरोना! आज 93 पॉझिटिव्ह अन्‌ चौघांचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : कडक संचारबंदीनंतर शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र होते. दररोज शंभरहून आढळणारी रुग्णसंख्या 50 ते 60 पर्यंत खाली आली. मात्र, मागील दोन दिवसांत शहरात 209 रुग्ण सापडले आहेत. स्वातंत्रदिनी 116 तर आज (रविवारी) 93 रुग्ण सापडले आहेत. चौघांचा मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या 391 झाली आहे.

म्हाडा कॉलनी (डी-मार्टजवळ), स्वामी विवेकानंद नगर, गणपती मंदिराजवळ (हत्तुरे वस्ती), पत्रा तालिमजवळ, सिध्देश्‍वर नगर, माळी नगर (एमआयडीसी), हांडे प्लॉट (जुना पुना नाका), स्टेट बॅंक कॉलनी (दयानंद कॉलेजवळ), न्यू पाच्छा पेठ, विष्णूपुरी, गणेश बिल्डर्स, चंद्रलोक नगर, बिलाल नगर (जुळे सोलापूर), न्यू तिऱ्हेगाव (फॉरेस्ट), मंत्री चंडक (विजयपूर रोड), उत्तर कसबा (मसरे गल्ली), शुक्रवार पेठ, मल्लिकार्जुन अपार्टमेंट (बाळीवेस), परमेश्‍वर नगर (मजरेवाडी), शिवाजी नगर (मोदी), धोत्रीकर वस्ती, मड्डी वस्ती (भवानी पेठ), शेळगी, आंबेडकर नगर (तालुका पोलिस ठाण्यामागे), नवजीवन नगर (गुरुनानक नगराजवळ), किसान संकुल (अक्‍कलकोट रोड), आदित्य नगर, राघवेंद्र टॉवर (जुना कुंभारी), शरण मठाजवळ (निमल नगर), थोबडे वस्ती, नई जिंदगी चौक (ढाबा गल्ली), कमला नगर, लोकमान्य हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), निराळे वस्ती, दुमणे नगर (बाळे), हत्तुरे वस्ती, आटीओ ऑफिसजवळ, गंगा बिल्डींग (एसआरपी कॅम्पजवळ), हुच्चेश्‍वर नगर भाग-एक, श्री नगर (आयएमएस शाळेजवळ), रामराज नगर (हत्तुरे नगर), सागर चौक, गोकूळ नगर, गडगी नगर (विडी घरकूल), सहारा नगर (नई जिंदगी), मित्र नगर (शेळगी), रविवार पेठ (जोशी गल्ली), विडी घरकूल ए ग्रूप, पीडब्ल्यूडी क्‍वॉर्टर (रंगभवनमागे), ओम नम:शिवाय नगर, मल्लिकार्जुन नगर, प्रभाकर हौसिंग सोसायटी (सम्राट चौक), एसआरपीएफ, दक्षिण कसबा आणि तेलंगी पाच्छा पेठेत नव्या रुग्णांची भर पडली आहे.

ठळक बाबी... 

  • स्वातंत्रदिनी दोन हजार 939 टेस्टमधून 116 जण आढळले पॉझिटिव्ह 
  • आज (रविवारी) एक हजार 490 अहवालापैकी 93 जणांना कोरोनाची बाधा 
  • शहरातील रुग्णसंख्या आता पाच हजार 898; आतापर्यंत 391 जणांचा झाला मृत्यू 
  • 48 हजार 326 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट; चार हजार 504 रुग्णांची कोरोनावर मात 
  • शहरात दररोज सरासरी 50 ते 60 रुग्ण सापडत होते; दोन दिवसांत मात्र, आढळले 209 रुग्ण 

'येथील' चार रुग्णांचा मृत्यू 
अक्‍कलकोट रोड परिसरातील पडगाजी नगरातील 49 वर्षीय महिला, आसरा चौक परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा, बाळे परिसरातील खडक गल्लीतील 45 वर्षीय पुरुषाचा आणि सम्राट चौक परिसरातील महेश नगरातील 77 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एकजण 3 ऑगस्टला तर दुसरा 7 ऑगस्टला उपचारासाठी दाखल झाला होता. 70 वर्षांवरील दोघे पाच दिवसांपूर्वी दाखल झाल्याचे अहवालात नमूद आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT