सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात दाखल झालेल्या कोरोनाचा खरा स्फोट सप्टेंबरमध्ये झाला आहे. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात आढळलेल्या 33 हजार 511 बाधितांपैकी 15 हजार 272 बाधित (एकूण बाधितांच्या 45 टक्के बाधित) फक्त एकट्या सप्टेंबर महिन्यात आढळले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान कोरोनामुळे मृत पावलेल्या एकूण एक हजार 157 व्यक्तींपैकी 408 जणांचा मृत्यू (एकूण मृतांच्या 35 टक्के मृत्यू) फक्त सप्टेंबरमध्ये झाला आहे.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, सोलापूर शहर या भागात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या भागातील चाचण्यांची संख्याच कमी केल्याने नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रॅपिड अँटीजेनमुळे बाधितांची संख्या वाढली आणि मृताचा टक्का कमी झाला.
कोरोना महापालिका हद्दीतील
महिना बाधित मृत्यू
एप्रिल 105 6
मे 841 89
जून 1448 166
जुलै 2677 113
ऑगस्ट 1647 45
सप्टेंबर 1769 59
एकूण 8487 478
कोरोना ग्रामीण भागातील
महिना बाधित मृत्यू
एप्रिल 2 1
मे 38 4
जून 321 13
जुलै 3292 85
ऑगस्ट 7868 227
सप्टेंबर 13503 349
एकूण 25024 679
जिल्ह्याचा एकूण कोरोना
महिना बाधित मृत्यू
एप्रिल 107 7
मे 879 93
जून 1769 179
जुलै 5969 198
ऑगस्ट 9515 272
सप्टेंबर 15272 408
एकूण 33511 1157
महापालिका हद्दीत अशा झाल्या टेस्ट
महिना चाचण्यांची संख्या
फेब्रुवारी 37
मार्च 33
एप्रिल 1702
मे 6656
जून 5604
जुलै 22335
ऑगस्ट 25534
सप्टेंबर 15860
एकूण 77761
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.