Corona closes family planning surgeries 
सोलापूर

कोरोनामुळे पाळणा लांबवण्याचे प्रयत्न...! 

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) : कोरोनाने सध्या सोलापूर जिल्ह्यातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे पाळणा लांबवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. 
कोरोना असल्याने सध्या लॉकडाउन असून नागरिकांना नाईलाजाने घरातच बसावे लागले आहे. याचा परिणाम विविध उद्योग व्यवसायावर झाला तसा कुटुंब नियोजनावर झाला आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी शासनाने तिसऱ्या अपत्याचा कायदा पारित केलेला असल्याने नागरिक याची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत. एखाद्या दांपत्याला एक किंवा दोन अपत्य झाले की लगेच त्या मातेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे भाग पडते. पुरुष नसबंदीला तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने स्त्रियांनाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. जिल्ह्याति जिल्हा परिषदेची सुमारे 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दरमहा किमान 15 ते 20 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होत असतात. त्यामुळे केवळ ग्रामीण भागातून दरमहा सुमारे एक हजारहून अधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. चालू दोन महिन्यांत दोन ते अडीच हजार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत केल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आता कोरोना असल्याने बंद केल्या आहेत. त्यामुळे गरजू नागरिक आता आपल्या घरचा पाळणा लांबवण्यासाठी विविध उपाय करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT